एक्स्प्लोर

Sanjay Raut : राज्य सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीय का? संजय राऊतांचा हल्लाबोल 

महाराष्ट्रात सध्या संतप्त वातावरण आहे. अशा स्थितीत सरकार आहे कुठं? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

Sanjay Raut : महाराष्ट्रात सध्या संतप्त वातावरण आहे. अशा स्थितीत सरकार आहे कुठं? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या बाबतीत सरकार गप्प. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, सांगली खेचून घेण्याची भाषा केली तरी सरकार गप्प. आता भाजपचे प्रचारक रामदेवबाबांनी महिलांविषयी अपमानकारक वक्तव्य केलं आहे, तरी सरकार गप्प आहे. या सरकारची जीभ दिल्लीला गहाण ठेवलीय का? एवढच मला विचारायचंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. आज सकाळी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

आज सगळ्यांचा समाचार घेतला जाईल

आज आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बुलढाण्याला जात आहोत. आजची बुलढाण्यातील सभा ही ऐतिहासीक होणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. आजच्या सभेत उद्धव ठाकरे हे अनेक विषयावरती आपल्या भूमिका व्यक्त करतील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राचा अपमान केला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल  राज्यपाल आणि भाजपच्या प्रवक्त्याने केलेलं वक्तव्य असेल, या सगळ्यांचा समाचार आज घेतला जाईल असेही संजय राऊत म्हणाले. त्यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

बुलढाण्याच्या भूमित निष्ठा आणि इमान याचंच बीज

ज्या मातेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा वीरपुरुष दिला त्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमित आजची जाहीर सभा होत आहे. त्या भूमित निष्ठा आणि इमान याचंच बीज रोवलं गेलं आहे. इथं बेईमानी करणाऱ्याला लोक अजिबात थारा देणार नसल्याचे राऊत यावेळी म्हणाले. या पवित्र भूमित आज विराट सभा होत असल्याचे राऊत म्हणाले.

रामदेवबाबा यांच्यावर टीका

रामदेवबाबा यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यावर देखील संजय राऊत यांनी टीका केली.  रामदेवबाबा यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आहे. ज्यावेळी त्यांनी वक्तव्य केलं त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील तिथे उपस्थित होत्या. त्या कशा गप्प बसल्या? असा सवाल राऊतांनी केला. असं वक्तव्य करणारा कोणाही, कितीही मोठा असो, त्याच्या सणसणीत कानाखाली बसायला पाहिजे असेही राऊत म्हणाले. एकिकडे तुम्ही महिला सबलीकरणाच्या गोष्टी करता, कायदे बनवता, ज्ञान पाजळता आणि त्याचवेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा महिलांचा अपमान करतो, तरीही सरकार गप्प असल्याचे राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

संजय राऊतांच्या 'त्या' भूमिकेला शिंदे गटातील मंत्र्याचा पाठिंबा; म्हणाले, पक्ष बाजूला ठेवून...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Rashmi Barve : काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बादZero Hour : विद्यमान खासदारांना डच्चू मिळाल्यानं मविआ-महायुतीमध्ये नाराजांची फौज |Lok Sabha ElectionMVA Loksabha Electoion 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम; 31 मार्चला दिल्लीत बैठकABP Majha Headlines :  10 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Embed widget