पोलीस भरतीची मोठी बातमी, राज्यात लवकरच सात हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार
Police Bharti पहिल्या टप्प्यात सात हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यांत लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
![पोलीस भरतीची मोठी बातमी, राज्यात लवकरच सात हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार Maharashtra news police recruitment police bharti for seven thousand posts will be completed in the state soon पोलीस भरतीची मोठी बातमी, राज्यात लवकरच सात हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/19/8a7420bcdfcdbc2d3fb722b8fc373a42_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण राज्यात आता सात हजार पदांची पोलीस भरती (Maharashtra Police Recruitment) होणार आहे. पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी एकाच वेळी भरती प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (Maharashtra Police Bharati 2022 news)
सात हजार पदांच्या भरती प्रक्रियेनंतर राज्यांत लवकरच आणखी एक मोठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. ही भरती दहा हजार पदांसाठी असल्याची माहिती मिळत आहे. सातत्याने समोर येणारे भरती प्रक्रियेतील घोटाळे लक्षात घेता आता भरती प्रक्रिया गृहखातं राबवणार आहे. ज्यातील पोलिसांचं बळ कमी आहे. त्यामुळं आम्ही मंत्रिमंडळासमोर पोलिसांची 50 हजार पदांची भरती करण्यासंदर्भात माहिती देऊ आणि त्यांसंदर्भात निर्णय घेऊ, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.
गेल्या दोन वर्षापासून देशासह राज्यात कोरोनाच्या संकटामुळे नोकरभरतीची प्रक्रिया छांबली होती. कोरोनाचा फटका पोलीस भरती प्रक्रियेला बसल्याने आवश्यकता असताना राज्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होऊ शकली नाही. राज्याची लोकसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाची गरज आहे. आता त्यामुळे राज्य सरकाराने सुरू केलेल्या हालचालीमुळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
वर्षातून एकदा पोलीस भरती ही होत असते. पोलीस दलात आपले कर्तव्य बजावण्याचे कित्येकांचे स्वप्न असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून वर्षभर ही लोकं तयारीला लागतात. पोलीस दलात सेवा बजावण्याचे यांचे स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. अशा तरूणांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)