(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शरद पवारांना भीमा कोरेगाव आयोगापुढे चौकशीकरता हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स जारी
पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरूच आहे.
मुंबई : भीमा कोरेगाव इथं घडलेल्या हिंसचाराची चौकशी करणाऱ्या जे. एन. पटेल आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हजेरीसाठी नव्यानं समन्स बजावलं आहे. येत्या 5 आणि 6 मे रोजी मुंबईत होणा-या सुनावणीत हजर राहण्यासाठी आयोगानं पवारांना बजावलेलं हे तिसरं समन्स आहे. याप्रकरणी शरद पवारांनी आपलं अतिरिक्त प्रतिज्ञापत्रही नुकतंच आयोगापुढे सादर केलं आहे. आयोगाकडून यापूर्वी 23 आणि 24 फेब्रुवारीला शरद पवार आपली साक्ष नोंदवण्यासाठी आयोगापुढे हजर राहणार होते, मात्र काही कारणास्तव ते हजर राहू शकले नव्हते.
1 जानेवारी 2018 रोजी पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरूच आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी उसळलेल्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं. तसेच या प्रकरणी वस्तुस्थिती आणि पुणे पोलिसांचा तपास यात कमालीचा विरोधाभास आहे, असं पवारांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होत. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांची साक्षही चौकशी आयोगाने नोंदवली पाहिजे अशी त्यांची मागणी करणारा अर्ज विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता.
या घटनेनंतर पवारांनी माध्यमांत केलेल्या काही विधानांवरून या घटनेसंदर्भात पवारांकडे यासंदर्भातील काही अधिकची माहिती उपलब्ध असण्याची शक्यता असल्याचं त्यांनी आपल्या अर्जात नमूद केलं होतं. त्याची दखल घेत आयोगानं शरद पवार यांना 23 आणि 24 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स पाठवलं होतं. त्यापूर्वी 4 एप्रिल 2021 ला शरद पवारांना आयोगापुढे साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचं समन्स जारी करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या :
Mumbai : लकडावालाचे शरद पवार, राजीव गांधींसोबत फोटो ट्विट करत मोहित कम्बोज म्हणाले...
Chandrakant Patil : जयंत पाटलांनी आधी शरद पवारांना हिमालयात जाण्याबाबत विचारावं, चंद्रकांत पाटलांची टीका
MNS : औरंगाबादमध्ये जमावबंदी, शरद पवारांची सभा होणार का? 1 मेच्या सभेसाठी प्रतीक्षेत असलेल्या मनसेचा सवाल