Nashik News : राऊत, आव्हाडांवरील गुन्हे मागे घ्या, आम्ही शिंदे गटात येतो.... नाशिकच्या माजी नगरसेविकांचे पत्र
Nashik News : राऊत आणि आव्हाडांवरील (Jitendra Avhad) गुन्हे मागे घेतल्यास शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
Nashik News : विरोधकांवरच गुन्हे दाखल होत असून त्यांच्यावरच सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे, असा आरोप होत असतानाच आता नाशिकच्या (Nashik) ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेविकेने यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लक्ष करत या गोष्टीवरून त्यांच्यावर निशाना साधला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) आणि जितेंद्र आव्हाडांवरील (Jitendra Avhad) गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे पत्र थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे. त्यांच्या या उपरोधिक पत्राची आता चांगलीच चर्चा रंगली असून ते व्हायरल देखील होत आहे.
शिंदे भाजप गट आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) यांच्यामध्ये राजकीय वॉर चांगलंच पेटलं आहे. पत्राचाळ प्रकरणी जेष्ठ नेते संजय राऊत जवळपास १०३ दिवस तुरुंगात होते. ते नुकतेच बाहेर आल्यानंतर आता जिंतेद्र आव्हाडांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व गोदारोळात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळेच विरोधक- सत्ताधारी यामधील काही नेते एकमेकांवर चिखलफेक करतांना दिसून येत आहेत. अशातच नाशिकमधील ठाकरे माजी नगरसेविकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना थेट ऑफर बहाल केली आहे. संजय राऊत आणि जिंतेद्र आव्हाड यांच्यावरील गुन्हे मागे घेतल्यास आम्ही शिंदे गटात प्रवेश करू असे पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.
शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांवर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करत असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा काम हे सरकार करत आहे. अशा प्रकारचा सूर विरोधकांमध्ये निघत आहे. त्यात आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे (Kiran Gamne) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार असून अन्य तीन सहकारी देखील माजी नगरसेविकांसोबत धूमधडाक्यात शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी पत्रात उल्लेखित केले आहे.
नाशिकच्या ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण गामणे -दराडे म्हणतात कि, संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांवरील गुन्हे मागे घेतल्यास बिनशर्त शिंदे गटात प्रवेश करणार आहोत. त्याचबरोबर अन्य तीन सहकारी माजी नगरसेविकांसोबत धूमधडाक्यात शिंदे गटात प्रवेश करेन असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. अशा पद्धतीने शिंदे भाजप गटातील नेते, महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये धुमशान पाहायला मिळत आहे. रोज नवे वाद बाहेर काढले जात आहेत. त्यामुळे नेमकं राज्यातील वातावरण कोणत्या दिशेने चालले आहे? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
काय म्हटलंय पत्रात?
माजी नगरसेविका यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे. त्यातील पुढील मजकूर, 'मुख्यमंत्री महोदय गेल्या चार दिवसात जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर व्यक्तिगत दोष मनात धरून दोन खोटे गुन्हे दाखल केले, तुरुंगात डांबले त्याचप्रमाणे खासदार संजय राऊत साहेब यांना बेकायदेशीर अटक केली. सर्व प्रकार निषेधार्थ आहे. "माननीय जितेंद्र आव्हाड व खासदार संजय राऊत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास आपला सन्मान करीत मी नगरसेविका किरण दराडे व माझ्यातील सहकारी नगरसेविका आम्ही बिन शर्ट शिंदे गटात तात्काळ धुमधडाक्यात प्रवेश करू." असे या पत्रात म्हटलं आहे.