Nashik Crime : नाशिकमधून तीन दिवसांत 13 लाखांच्या दुचाकी सापडल्या, दुचाकी चोरही ताब्यात
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोटारसायकल चोरीचे (Two Wheeler Theft) प्रमाण अत्यंत वाढले आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात मोटारसायकल चोरीचे (Two Wheeler Theft) प्रमाण अत्यंत वाढले आहे. रात्री तर चोरी होतेच, मात्र आता दिवसा ढवळ्या देखील पार्क केलेल्या दुचाकी चोरटे लंपास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र नाशिक शहरात मागील तीन दिवसांत पोलिसांनी याबाबत महत्वाची कामगिरी करून दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नाशिक पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून तब्बल शहराच्या विविध भागातून चोरलेल्या 13 दुचाकी संशयितांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. .
नाशिक शहरात गुन्हेगारीसह चोरी, लुटमारीच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे नागरिक देखील धास्तावले असून दुचाकी चोरट्यांमुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शिवाय दुचाकी किंवा इतर वाहने सुरक्षित ठेवायची तरी कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे. अशातच नाशिक पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी केली असून मागील तीन दिवसांत दुचाकी चोरीच्या घटनांचा पाठपुरावा करून चोरट्याना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान नाशिक पोलीस ठाण्याच्या गुन्हेश्वर पथकाने मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल केली असून लाखो रुपयांच्या 13 मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत. नाशिक पोलिसांनी पुन्हा उल्लेखनीय कामगिरी करून शहर व परिसरातुन मोटरसायकल चोरांना अटक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व नाशिक रोड परिसरात दुचाकी गाड्यांचे चोरी सातत्याने होत आहे. सदरचे चोरटे हे दुचाकी गाड्या चोरून कमी किमतीत ग्राहकांना विकत असल्याची गुप्त माहिती नाशिक पोलिसांना मिळत होती. त्या अनुषंगाने तपास सुरु होता. तर पहिली कारवाई ही पंचवटी परिसरात घडली असून मोटार वाहन चोरी प्रतिबंधक गस्त करीत असतांना पाटावरून पेठरोडच्या दिशेने विना नंबर प्लेट मोटार सायकल घेवुन जात असतांना दिसला. त्यास हटकले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेतले. त्यानुसार मोटार सायकल चोरी बाबत गुन्हा दाखल असल्याचे समजले. या प्रकरणी तुषार हरीदास चाफळकर यांच्याकडून 50 हजार रुपयांच्या दोन मोटारसायकल्स हस्तगत करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत नाशिक शहरातील वडनेर दुमाला परिसरात दोन इसम मोपेड विक्री करण्याच्या दृष्टीने आले आहोत. यावेळी गुन्हेशाखा युनिट 2 च्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार दोन इसमांना पथकाने ताब्यात घेत चौकशी केली असता मोपेड ही निमाणी येथून चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी सातपूर पोलीस ठाणे हद्दीतून आणखी एक मोटरसायकल चोरी केल्याचे समोर आले. जवळपास दोन्ही मोटरसायकल या 01 लाख 20 हजारांच्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या दोघांनाही ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तर तिसऱ्या घटनेत मनोज गोरख मांजरे, अमोल उर्फ गणेष दत्तात्रय वाडीले, मनोज उर्फ सल्लु दिलीप कापसे या संशयितांकडे चोरीच्या मोटार सायकल असल्यााबाबत कुंदन सोनोने यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता नाशिक शहरातून तसेच तोफखाना पोलीस ठाणे व कोतवाली पोलीस ठाणे जि. अ.नगर येथुन मोटार सायकल चोरी केल्याचे कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडुन बुलेट मोटार सायकलसह विविध कंपन्याच्या एकुण 11 लाख 50 हजार रूपये किंमतीच्या 9 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.