Sadabhau Khot : गांधी परिवाराने पाप मुक्त यात्रा काढायला हवी होती, सदाभाऊ खोत यांचा घणाघात
Sadabhau Khot : गांधी परिवाराने पाप मुक्त यात्रा काढायला हवी होती, असा खरमरीत सल्ला सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिला आहे.
Sadabhau Khot : राहुल गांधी (Rahul Gandhi) राष्ट्रीय नेते आहेत, घरी आलेल्या पाहुण्यांचा स्वागत केल पाहिजे. काँग्रेसच्या (Congress) काळात साडे चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तेव्हा काँग्रेस कुठे होती. गांधी घराण्याच्या काळात कोणतेही चांगले कार्य झाले नाही. त्यामुळे गांधी परिवाराने पाप मुक्त यात्रा काढायला हवी होती. त्या यात्रेद्वारे काशीला जाऊन पाप मुक्त होऊन जनतेसमोर येण गरजेचं होतं, असा खरमरीत सल्ला सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना दिला आहे.
रयत क्रांती संघटनेचे (Rayat Kranti Sanghatana) अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्यभर पक्षवाढीसाठी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी राज्यभर दौरा करणार असल्याचे आज नाशिकमध्ये जाहीर केले आहे. सदाभाऊ खोत यांनी नाशिकमधून रयत क्रांती संघटनेच्या राज्यव्यापी दौऱ्याला सुरवात करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. ते यावेळी म्हणाले, रयत क्रांती संघटनेच्या राज्यव्यापी दौरा सुरु झाला असून नाशिकमधून शुभारंभ झाला आहे.
ते पुढे म्हणाले, पहिल्या टप्प्यात खानदेश आणि विदर्भ चा समावेश असून या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर पीक परिस्थितीची पाहणी करणार आहोत. या दौऱ्याचा समारोप पुणे शहरात होणार आहे. अतिवृष्टी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, मात्र तरीदेखील विरोधी पक्ष सत्ता गेल्याने पिसाळलेला आहे. विरोधी पक्ष सर्वसामान्य नागरिकांबाबत बोलायला तयार नाही. विरोधी पक्ष आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त असून बेजाबदरपणे वागत आहे. दरम्यान मित्र पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी भाजप सोबत असून योग्य न्याय मिळेल अशी आशा सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली. सरकार चालवण्याच्या दृष्टिने योग्य निर्णय घेतला जाईल अशी आशा असून मंत्र्यांनी संकटाच्या काळात जागरूक पणाने काम करणं गरजेचं असल्याचे ते म्हणाले.
कांदा दराबाबत ठोस भूमिका महत्वाची
आदित्य ठाकरेंवर ते म्हणाले कि, आदित्य ठाकरेंना आड मार्गाने का होईना चांगली संधी मिळाली होती. मात्र ती संधी हुकली आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यापर्यत जाण गरजेचं होत. जेव्हा करण्याची वेळ होती, तेव्हा केले नाही. आता दौरे करण्या ऐवजी सत्ता असताना दौरा करणं गरजेचं होतं, आता दौरे करून काय फायदा, असा खोचक टोला त्यांनी यावेळी आदित्य ठाकरे याना लगावला. सदाभाऊ कांद्याबाबत म्हणाले कि, कांद्याबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका घेण गरजेचं असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचे भाव कोसळतात. पहिल्या दौऱ्या दरम्यान योग्य निर्णय झाला नाही तर पहिल्या टप्यानंतर नाशिकमध्ये कांदा परिषद घेऊ, त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.