Nashik MNS : 'राज साहेबांचा पिक्चरला आवाज म्हणून...' नाशिक मनसेचा 'हर हर महादेव'ला पाठिंबा
Nashik MNS : राज साहेबांचा (Raj Thackeray) आवाज 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) चित्रपटाला असल्यामुळे या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
Nashik MNS : राज ठाकरे यांचा (Raj Thackeray) आवाज 'हर हर महादेव' (Har Har Mahadev) चित्रपटाला असल्यामुळे या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मात्र अशा पद्धतीने मराठी चित्रपटांची (Marathi Movie) अडवणूक होणार असेल, तर मनसे खंबीर उभी आहे, हर हर महादेव'चा शो चित्रपटगृहांमध्ये परत लागला पाहिजे, अन्यथा मनसे (MNS) स्टाईलने उत्तरं दिले जाईल, असा इशारा नाशिक (Nashik) मनसेने दिला आहे.
गेल्या दोन दिवसांपासुन हर हर महादेव (Har Har Mahadev) आणि वेडात मराठे वीर दौडले सात (Vedat Marathe Veer Daudale Sat) या मराठी चित्रपटांना (Marathi Movie) राज्यभरातून विरोध होत असून अनेकांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आज नाशिक (Nashik) शहरातील कुठल्याच थिएटरमध्ये आज हर हर महादेवचे शो नसल्याचे समोर आले आहे. टाय पार्श्वभूमीवर मनसेने नाशिकच्या सिटी सेंटर मॉल मधील थिएटरला चालकाला निवेदन देऊन चित्रपट सुरु करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान काही वेळापूर्वीच या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत थिएटर चालकाला चित्रपट प्रदर्शित करू नये, यासाठी निवेदन देण्यात आले, त्यांनतर काही वेळातच मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी थिएटर चालकाला निवेदन देत चित्रपट सुरु करण्याची मागणी केली. त्यामुळे थिएटर चालकाचा गोंधळ उडाला. यावेळी जिल्हाध्यक्ष अंकुश पवार म्हणाले कि, गेल्या आठवड्यापासून चित्रपट सुरू आहे. आज अचानक काहीतरी साक्षात्कार काही लोकांना झाला आणि त्यांनी महाराष्ट्रातले सगळे शो बंद करण्याचा घाट घातला. ज्या लोकांना या चित्रपटाच्या बाबतीत आक्षेप असेल त्यांनी सेन्सॉरबोर्डाकडे आक्षेप नोंदवावे त्यांच्याकडून जर चित्रपटाला मान्यता भेटली नाही, तर काय ते ठरविता येईल, असा सूचक सल्ला त्यांनी यावेळी विरोध करणाऱ्यांना दिला.
ते पुढे म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासनाने जे चित्रपट आहे, हे चालू दिले गेले पाहिजे. जर ते तसं होत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने आंदोलन करणार असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांचा आवाज त्या पिक्चरला असल्यामुळे अनेक लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मात्र आता चित्रपटाला विरोध केला जात आहे. मग आम्ही पण तयार आहोत, त्यासाठी पिक्चर चित्रपटगृहांमध्ये परत लागला पाहिजे, मराठी चित्रपटांवर अशा प्रकारचे अन्याय होऊ देता कामा नये, छत्रपती शिवाजी महाराजांचं बघितलं तर आतापर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट येत आहेत, मावळ्यांवर चित्रपट येत आहेत. अशा चित्रपटांतून संस्कृती रुजवली जात आहे. मात्र अशा संस्कृतीला विरोध म्हणून या लोकांनी चित्रपट बंद करण्याचा घाट घातला असल्याचे ते म्हणाले.
काय आहे प्रकरण
दरम्यान हर हर महादेव आणि वेडात दौडले सात हे दोन चित्रपटांविषयी सध्या वाद सुरु आहे. सुरवातीला संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात आवाज उठविला. त्यांनी पत्रकार परिषद घेत चित्रपटांना विरोध दर्शवला. ते म्हणाले कि, 'हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. हे असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं, आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवायचं? 'सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं चित्रपटात काही पण दाखवायचं?' अस म्हणत संभाजीराजे यांनी विरोध केला आहे. त्यानंतर अनेक ठिकाणाहून विरोध होण्यास सुरवात झाली.