Nashik Election: महिलांना पाच हजारांची पैठणी, पुरुष मतदारांना घरपोच पाकिटं; नाशिक निवडणुकीतील उमेदवाराचा गंभीर आरोप
Nashik Election : नाशिक पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी सत्यजीत तांबेवर गंभीर आरोप केले आहेत.
Nashik Election : नाशिक (Nashik Graduate Constituency) पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी सत्यजीत तांबेवर गंभीर आरोप केले आहेत. सत्यजीत तांबेंनी महिला मतदारांना 5 हजारांची पैठणी आणि पुरुष उमेदवारांना 3 ते 5 हजार रुपये वाटल्याचा आरोप जंगलेंनी (Subhash Jangale) केला आहे. आपल्या मतदार मित्रांकडून ही माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
नाशिक (Nashik) पदवीधरची निवडणूक मतमोजणी (Vote Counting) सुरू आज सकाळपासून सर्वांचे लक्ष या निवडणूक मतमोजणीकडे लागले आहे. अशातच अपक्ष उमेदवार म्हणून असलेले सुभाष जंगले यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीची नाशिक पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांनी सत्यजीत तांबे यांच्यावरती गंभीर आरोप केले. महिला मतदारांना 5 हजार रुपयांची पैठणी आणि पुरुष उमेदवारांना तीन ते पाच हजार रुपये वाटल्याचा आरोप जंगलेंनी केला आहे. आपल्या मतदार मित्रांकडून ही माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे. जंगले यांच्या आरोपानंतर नाशिक पदविधर निवडणुकीत खळबळ उडाली असून एकीकडे निकाल बाकी असताना जंगलेच्या आरोपांमुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सुभाष जंगले यावेळी म्हणले की, संपूर्ण महाराष्ट्रभर नाशिक पदवीधर निवडणुकीची चर्चा रंगली. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीमध्ये काय काय घडलं. तर एक उमेदवारांनी दोन्ही राष्ट्रीय पक्षाला फसवलं. दोन्ही राष्ट्रीय पक्ष त्याला उमेदवारी देण्यासाठी मागे मागे फिरत होते, मात्र त्यांनी उमेदवारी न घेता अपक्ष उमेदवारी केली. दोन्ही पक्षांचे मत मिळवण्याचा प्रयत्न केला. तसेच या निवडणुकीनिमित्त नगर जिल्ह्यातील राजकारण कशाप्रकारे चालतं, हे प्रथमतः स्पष्ट झालं. वेगवेगळ्या पक्षांमध्ये असलेले एकमेकांचे पाहुणे असले तरी जर एखादा उमेदवार निवडून आणायचा असेल. सर्व पक्ष बाजूला ठेवून ते कशाप्रकारे एकत्र येतात आणि त्या उमेदवाराला निवडून आणतात, याचा प्रत्यय निवडणुकीतून दिसून आला.
सत्यजीत तांबेंवर आरोप...
यावेळी सत्यजीत तांबेंवर आरोप करताना ते म्हणाले की, नाशिक पदवीधर निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार सत्यजित तांबे हे ज्युनिअर आहे. 94 ला महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी होतो, त्यावेळी राजीनामा दिला . त्याने तांबे 2000 ला प्रदेश सेक्रेटरी झाले. तर तो मित्रच आहे. मात्र या निवडणुकीत वेगळे राजकारण पाहायला मिळाले. अनेक मित्रांकडून, कार्यकर्त्यांकडून नाशिक जिल्ह्यातून, जळगाव,अहमदनगरमधून फोन आले की, महिलांना पाच हजार रुपयाची पैठणी साडी तसेच पुरुष मतदारांना पाकिटामध्ये 3000 पासून 5000 पर्यंत पैसे त्यांनी मायक्रो नियोजन करून घरपोच केले. तर निवडणुकीचा निकाल काय लागणार? हे स्पष्ट झाले आहे.
तसेच, या निवडणुकीतून राजकीय नेते कशी खेळी करतात हे देखील दिसून आले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार अगोदर राष्ट्रवादीत होत्या, नंतर भाजपात प्रवेश केला. या निवडणुकीत अचानक सेनेने जागा मागून घेतली, सेनेने त्यांना उमेदवारी दिली. 2012 पासून सेनेचा पदाधिकारी आहे. परंतु सेनेतील एका नेत्याने कुणाशीही चर्चा न करता त्यांना उमेदवारी दिली, असा आरोपही सुभाष जंगले यांनी उमेदवार शुभांगी पाटील यांचे नाव घेतला केला आहे.