![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Har Har Mahadev : नाशिकमध्ये 'हर हर महादेव'चा एकही शो नाही, किती दिवस बंद राहणार निश्चित नाही...
Har Har Mahadev : नाशिक (Nashik) शहरातील कुठल्याच थिएटरमध्ये आज हर हर महादेवचे शो नसल्याचे समोर आले आहे.
![Har Har Mahadev : नाशिकमध्ये 'हर हर महादेव'चा एकही शो नाही, किती दिवस बंद राहणार निश्चित नाही... maharashtra news nashik news 'Har Har Mahadev' is not showing in Nashik theaters Har Har Mahadev : नाशिकमध्ये 'हर हर महादेव'चा एकही शो नाही, किती दिवस बंद राहणार निश्चित नाही...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/08/a8c31c90618b5650becbd2b852b97366166789486231789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Har Har Mahadev : गेल्या दोन दिवसांपासुन हर हर महादेव (Har Har Mahadev) आणि वेडात मराठे वीर दौडले सात (Vedat Marathe Veer Daudale Sat) या मराठी चित्रपटांना (Marathi Movie) राज्यभरातून विरोध होत असून अनेकांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आज नाशिक (Nashik) शहरातील कुठल्याच थिएटरमध्ये आज हर हर महादेवचे शो नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे थिएटर व्यावसायिकांच्या व्यवसायावर या गदारोळामुळे चांगलाच परिणाम होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला हर हर महादेव आणि वेदात मराठे वीर दौडले सात हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटांना राज्यभरातून जोरदार विरोध होत आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी या चित्रपटावर आक्षेप घेतल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर ताशेरे ओढले आहेत. चित्रपट बंद करा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहेत. तर अनेक ठिकाणी शो बंद पाडण्यात आले आहेत. तर अनेकांनी थिएटरमध्ये जाऊन राडा केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. यायचं पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हर हर महादेव या चित्रपटाचे सर्व शोज बंद करण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून थिएटर चालक/मालकांकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
हर हर महादेव आणि वेदात मराठे वीर दौडले सात या मराठी चित्रपटांना विरोध करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत या चित्रपटांना विरोध केला. ते म्हणाले, कि या चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच या चित्रपटांतील मावळ्यांची वेशभूषादेखील ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा दावा संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. त्यानंतर सर्वच ठिकाणी याविरोधात आवाज उठविण्यास सुरवात झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नाशिक शहरातील थिएटर चालकांनी शो बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते, मात्र शोज किती दिवस बंद राहतील हे अद्याप निश्चित नसल्याचे ते म्हणाले.
काय आहे प्रकरण
दरम्यान हर हर महादेव आणि वेडात दौडले सात हे दोन चित्रपटांविषयी सध्या वाद सुरु आहे. सुरवातीला संभाजीराजे छत्रपती यांनी यासंदर्भात आवाज उठविला. त्यांनी पत्रकार परिषद घेत चित्रपटांना विरोध दर्शवला. ते म्हणाले कि, 'हर हर महादेव चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्यात आला आहे. हे असे चित्रपट आपण लोकांपुढे घेऊन जायचे? सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं, आपल्याला आधिकार दिले आहेत, म्हणून आपण चित्रपटात काही पण दाखवायचं? 'सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं चित्रपटात काही पण दाखवायचं?' अस म्हणत संभाजीराजे यांनी विरोध केला आहे. त्यानंतर अनेक ठिकाणाहून विरोध होण्यास सुरवात झाली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)