Nashik Godawari : हर हर नमामि गोदे! नाशिकला रामकुंडावर गोदेची महाआरती होणार
Nashik Godawari : नाशिकच्या (Nashik) गोदावरी नदीची (Godawari River) रोज महाआरती (MahaArati) होणार आहे.
Nashik Godawari : अयोध्या, वाराणसी आणि हरिद्वारच्या (Haridwar) धर्तीवर आता नाशिकच्या (Nashik) गोदावरी नदीची (Godawari River) देखील रोज महाआरती (MahaArati) होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता. अखेर गोदावरी नदीवर महाआरतीसाठी निधी मंजूर झाला आहे.
नाशिक मंदिराची नगर म्हणून ओळखली जाते. शिवाय गोदावरीच्या काठावर वसलेले नाशिक सर्वदूर परिचित आहे. नाशिकसह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे कुंभमेळा देखील भरत असतो आणि याठिकाणी देशभरातील भाविक आणि अनेक नागरिक अस्ती विसर्जनासाठी येत असतात गोदावरी नदीला अनन्य साधारण महत्व देखील प्राप्त आहे. त्यामुळेच आता गंगेप्रमाणे नाशिकच्या रामकुंड परिसरात रोज महाआरती होणार आहे. तर या महाआरतीसाठी सरकारकडून आता निधी मंजूर करण्यात आला आहे. गंगा नदीला मोठं धार्मिक महत्त्व देखील प्राप्त आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला देखील दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते. गोदावरी नदी देखील गंगा नदीप्रमाणेच धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली एक महत्त्वाची नदी आहे.
दरम्यान या संकल्पासाठी राज्य सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Manguntiwar) यांनी हिरवा कंदील दिला असल्याची माहिती महंत अनिकेत शास्त्र देशपांडे यांनी दिली. देशातील हरिद्वार वाराणसी आयोध्या सारख्या तीर्थक्षेत्रांप्रमाणेच गोदावरी नदीची ही महाआरती आता होणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात नाशिककर या महाआरतीनेच करतील असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला. या महाआरतीसाठी सरकारने पाच कोटींचा निधी देण्याची घोषणा केल्याचे देशपांडे यांनी सांगितले. देशपांडे यांनी केंद्र सरकारकडे गोदेच्या महाआरतीसाठी निधीची मागणी केली होती. या मागणीवर लक्ष घालण्याच्या सूचना केंद्राने राज्य सरकारला दिल्या होत्या. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक निर्णय घेत महातीसाठी पाच कोटींची घोषणा केल्याचे देशपांडे यांनी सांगितले, येथे आठवडाभरातच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सरकारला आराखडा पाठवण्यात येणार आहे. दरम्यान नमामि गोदा हा केंद्र सरकारचा स्वतंत्र प्रकल्प असून त्यासाठी 800 कोटींची स्वतंत्र तरतूद असली तरी देखील महाआरतीसाठी ऐनवेळी निधीची कमतरता पडत असल्यास यातून जी गरज देखील पूर्ण केली जाईल, अशी आश्वासन महापालिका प्रशासनाकडून मिळाल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.
प्रशासनांकडून निधीबाबत सद्धिंगता
महंत अनिकेतशास्त्री जोशी यांच्या म्हणण्यानुसार पडूहील काही दिवसांत गोदेच्या नियमित आरतीला प्रारंभ होणार आहे. यासाठीचा निधी मंजूर झाल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र नाशिक जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रशासन याबाबत माहितीच्या प्रतिशत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नाशिकसाठी असे काही नियोजन असेल तर नक्कीच सरकारच्या आदेशांचे पालन केले जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली.