Nashik Viral Video : चालत्या ट्रकमधून बकऱ्यांची चोरी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, इगतपुरीची घटना
Nashik Viral Video : चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (social Media) व्हायरल झाल्याचे समोर आले होते.
Nashik Viral Video : चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्याचे समोर आले होते. ट्रक मागून येणाऱ्या चारचाकीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चित्रीकरण केले होते. व्हायरल झालेला हा व्हिडीओ इगतपुरी जवळचा असल्याचे स्पष्ट झाले असून संबंधितांविरोधात घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपासून समाज माध्यमावर सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. व्हिडीओमध्ये एका चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्यात येत असल्याचा निर्दयी प्रकार समोर येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ आधी उत्तर प्रदेशमधील असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) उन्नाव पोलिसांनी हा व्हिडीओ महाराष्ट्रातील इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील असल्याचं ट्वीट केलं. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील खंबाळे फाटा परिसरातील हा व्हिडीओ आहे. घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला असल्याने घोटी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर व्हिडीओ दोन दिवसांपासून समाज माध्यमांत व्हायरल होत होता. एका चालत्या ट्रकवरून बकऱ्या रस्त्यावर फेकतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत चालत्या ट्रकमधून एक युवक रस्त्यावर बकऱ्या टाकत असल्याचे दिसत आहे. साधारण पाचशे मीटर अंतरापर्यत हा प्रकार सुरु असल्याचे दिसते. तर या ट्रकच्या बाजूलाच एका कार जात असताना दिसत आहे. बकऱ्या रस्त्यावर टाकल्यानंतर हा युवक या चारचाकीत ट्रकमधून उतरत आहे. याच कारच्या पाठीमागून पुन्हा एक कार जात असताना या कारमधील प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
सुरुवातीला हा व्हायरल व्हिडीओ उतर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात होते. मात्र व्हायरल व्हिडीओची उत्तर प्रदेश पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर सदरचा व्हिडीओ हा इगतपुरी तालुक्यातील घोटी जवळचा असल्याचे स्पष्ट झाले. ट्रक मागून येणाऱ्या चारचाकीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. घोटी पोलिसांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेत सुमोटो कारवाई करण्यात आली असून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, व्हिडीओ कधीचा आहे, कोणाचा आहे? बकऱ्या रस्त्यावर का फेकत होते? या बद्दल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र प्राण्यांचे निर्दयी, अमानवीय पद्धतीने हाल केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बकऱ्यांची चोरीच?
दरम्यान, नाशिक (Nashik) मुंबई आग्रा महामार्गावरील ही घटना असून यात बकऱ्यांनी भरलेला ट्रक मुंबईच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. तर या ट्रकच्या वर एक युवक चढलेला दिसून येत असून तो बकऱ्या ट्रकमधून काढून रस्त्यावर फेकत आहे. या ट्रकच्या समांतर एक चारचाकी कार धावत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. काही बकऱ्या रस्त्यावर फेकल्यानंतर हा युवक खाली समांतर चाललेल्या चारचाकी वाहनात उतरत आहे. त्यावरून हा प्रकार बकऱ्या चोरण्यासाठी करण्यात आल्याचे दिसते आहे. या कारमागे असलेल्या कारमधील प्रवाशांनी याचे चित्रीकरण केल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
चालत्या ट्रकमधून बकऱ्या फेकण्याचा प्रकार इगतपुरी जवळचा असून या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.#Nashik #Igatpuri #Ghoti #ViralVideo pic.twitter.com/bLkePgHplQ
— PAWAR GOKUL (@TheJournalistDD) May 2, 2023