CM Eknath Shinde : महाराष्ट्रात शांतता राखण्याचं काम सरकारचं, ते आम्ही करतोय; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
CM Eknath Shinde : महाराष्ट्रामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचा काम सरकारचं आहे, ते आम्ही करतोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
CM Eknath Shinde : महाराष्ट्रात (Maharashtra) सर्व जातीधर्माचे लोक राहतात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे, मात्र त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. त्याचबरोबर शेवटी हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचा काम सरकारचं आहे, ते आम्ही करतोय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक घटनांमुळे वातावरण बिघडल्याचे चित्र आहे. अकोला, शेवगाव, त्र्यंबकेश्वर या शहरात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. सद्यस्थितीत परिस्थिती निवळली असून त्र्यंबकच्या (Trimbakeshwer) घटनेसंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एसआयटीचौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केले आहे. जातीय तेढ होऊ नये, यासाठी समाजातील सर्वांनी पुढे येऊन सहकार्य करण्याची गरज आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, शांतता राखणे गरजेचे आहे, असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
यावेळी शिंदे म्हणाले की, कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि म्हणून या शासनामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन कार्यक्रम उत्सव होत आहेत. परंतु काही समाजकंटक जातीय तणाव निर्माण करण्याचा आणि द्वेष भावना पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करत असतील तर याच्यावर कठोर कारवाई सरकारच्या माध्यमातून, गृह विभागाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून होईल. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशा प्रकारचा आवाहन हे कालच केलेले आहे. शेवटी हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचा काम सरकारचं आहे. तसेच सर्व समाजाने देखील यामध्ये सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असल्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.
पंढरपूर यात्रेसाठी पाच हजार विशेष बसेस
आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दि. 25 जुन ते 05 जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (27 जुन रोजी) 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी सुमारे पाच हजार गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. औरंगाबाद येथून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 तर अमरावती येथून 700 अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.