(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : आदिवासी बांधवांचा निसर्गाला समजून घेण्याचा गुण महत्वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
CM Eknath Shinde : आदिवासी बांधव हा निसर्ग पूजक असून निसर्गात आणि पर्यावरणातल्या पशुपक्षांना दैवत मानणार आहे.
CM Eknath Shinde : आदिवासी बांधव हा निसर्ग पूजक असून निसर्गात आणि पर्यावरणातल्या पशुपक्षांना दैवत मानणार आहे. त्यामुळे विकासाच्या संकल्पना राबवताना आदिवासी बांधवांचा निसर्गाला समजून घेण्याचा हा गुण आपल्यालाही उपयुक्त ठरणार आहे. भगवान बिरसा मुंडा (Birsa Munda) यांनी जल, जंगल आणि जमीन या आपल्या न्याय हक्कांसाठी ब्रिटिशांच्या राजवटी विरोधात एल्गार पुकारला, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी व्यक्त केले.
आज नाशिकमध्ये (Nashik) क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने आदिवासी जनजातीय गौरव दिवस दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. स्वातंत्र्य चळवळीत आपल्या आदिवासी बांधवांचे (Tribal Community) अपूर्व असे योगदान आहे. भगवान बिरसा मुंडा (Birsa Munda) यांनी जल, जंगल आणि जमीन या आपल्या न्याय हक्कांसाठी ब्रिटिशांच्या राजवटी विरोधात एल्गार पुकारला. या महान क्रांतिकारी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन करतो. जय जंगल जमीन साठी लढताना शहीद झालेल्या आदिवासी बांधवांना माता-भगिनींच्या स्मृती नाही, वंदन करतो बिरसा मुंडा आणि पेटवलेली स्वातंत्र्य चळवळीची ज्योत आपल्या आदिवासी बांधवांना बांधवांनी कधी विझु दिली नाही. त्यामुळे पुढे जंगल आणि जमिनीचा लढा आपल्या देशाला स्वातंत्र्य पर्यंत घेऊन गेला.
ते पुढे म्हणाले, देशभरातील अनेक वेगवेगळ्या जमातीने ब्रिटिशा विरोधात बंड पुकारलं, निकराचा लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीतील आदिवासी बांधवांचे योगदान जे आहे हे लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षापासून आदिवासी गौरव महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. याच आदिवासी बांधवांच्या शौर्य धैर्य आणित्यागाला नमन करण्यासाठी हा महोत्सव अतिशय महोत्सव महत्वपूर्ण ठरेल, असं मला विश्वास वाटतो. आदिवासी बांधवांच्या या संस्कृतीत आपल्या मातीचा गंध आहे. आदिवासी बांधवांनी केवळ आपली संस्कृती जतन केली नाही, तर या जंगलातील निसर्ग संपदा ही जतन केली आणि त्याचं संवर्धन देखील केलेला आहे. याच मातीत रुजलेल्या वाढलेल्या संस्कृतीचे वैभव आपल्या आदिवासी बांधव या महोत्सवातून मांडत आहेत. त्याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आदिवासी बांधवांचे वैभव हस्तकला प्रदर्शन पारंपारिक नृत्य स्पर्धा आणि लघुपट महोत्सवातून नक्की उलगडणार आहे.
देशाच्या सर्वोच्च स्थानी आदिवासी समाजाच्या मुर्मू विराजमान होण्याची संधी देखील मिळालेली आहे. आदिवासी महोत्सवांमध्ये खाद्यपदार्थांपासून दाग दागिने, वारली, चित्रकला, गोडी चित्रकला असेल गवताच्या वस्तू असतील, बांबू काम, शिल्प काम, धातू काम, माती काम, पारंपारिक वनौषधी, लाकडावर वारली चित्र, पारंपारिक वेशभूषा ही लक्षवेधून घेते आदिवासी बांधव असेच मधाप्रमाणे, मोहाच्या वृक्षाप्रमाणे बहू उपयोगी आणि निसर्गाला धरून त्यांचं बोट धरून चालणारे आहे. म्हणूनच आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, आज आदिवासी समाजाला देखील मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचे ते म्हणाले.
आज सर्वजण वातावरणीय बदल आणि पर्यावरणाची काळजी घेत आहोत. मात्र फार पूर्वीपासून आदिवासी बांधव हा निसर्ग पूजक असून निसर्गात आणि पर्यावरणातल्या पशुपक्षांना दैवत मानणार आहे. त्यामुळे विकासाच्या संकल्पना राबवताना आदिवासी बांधवांचा निसर्गाला समजून घेण्याचा हा गुण आपल्यालाही उपयुक्त ठरणार आहे. आदिवासी बांधवांच्या अंगभूत आणि आवश्यक गोष्टीचा वापर वाढवावा लागेल, त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत पदार्थ आहेत. त्या सर्वाना पुढे नेण्यासाठी काही शासनाच्या माध्यमातून, जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मदत केली पाहिजे, आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. यापुढे धोरण राबविताना कृषी, पर्यटन आणि शिक्षण आरोग्य यामध्ये देखील आदिवासी बांधवांचे प्राधान्याने आपल्याला विचार करावा लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी भागात कनेक्टिव्हिटी वाढविणार ...
राज्य सरकार पुढील काळात कालबद्ध कार्यक्रम याकडे यासाठी तयार करेल आणि कनेक्टिव्हिटी प्रत्येक ठिकाणी मिळेल असा प्रयत्न राज्य सरकारचा असेल. यामध्ये न जोडलेली गाव पाडे वाड्यावर वस्ती यांना रस्त्याने जोडणारे तसेच जे रस्ते सहामायी आहेत, ते बारमाही करण्यासाठी राज्य सरकार पुढील काळात कालबद्ध कार्यक्रम तयार करेल आणि कनेक्टिव्हिटी प्रत्येक ठिकाणी मिळेल असा प्रयत्न राज्य सरकार करेल. त्याचबरोबर केंद्र सरकार प्रमाणे इतर राज्यात देखील आदिवासींसाठी स्वतंत्र अशा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची आवश्यकता असून यासाठी सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.