(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Sanjay Raut : निर्भय बनो! माझा गुन्हा काय? नाशिक पोलिसांवर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांचा दबाव, संजय राऊत यांचे नवे ट्वीट
Nashik Sanjay Raut : माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी नाशिक पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता, असे संजय राऊत म्हणाले.
Nashik Sanjay Raut : नाशिक (Nashik) पोलिसांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. जरी गुन्हा दाखल झाला असला तरी मी कारवाईला सामोरे जाणार, मात्र माझा अपराध काय? असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे.
मागील आठवड्यात संजय राऊत हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी खासगी कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर त्यांनी शनिवारी नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले होते की, राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये. या वक्तव्याप्रकरणी नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून देखील प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यावेळी म्हणाले की, जरी माझ्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी मी कारवाईला सामोरे जाणार आहे. माझ्यावर दबाव टाकून मला शरण यायला भाग पाडणे, शिवसेना (Shivsena) सोडायला लावणे, उद्धव ठाकरे यांना सोडायला लावणे, अशा प्रकारची दबावनिती सुरू आहे. मात्र या दबावनीतीला आम्ही बळी पडणार नाही. प्रत्येक कारवाईला सामोरे जाण्याची धमक आहे. त्यावेळी बोललो ते अधिकाऱ्यांना भडकवण्याचा हेतू नव्हता, ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारविरोधात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला, त्यावरून माझे मत व्यक्त केले. यात माझा अपराध काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
माझा गुन्हा काय?
तर संजय राऊत यांनी ट्विटरवर याबाबत भूमिका मांडली आहे. संजय राऊत ट्विटमध्ये लिहतात की, 'नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री, गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे 'गठन' बेकायदेशीर ठरले आहे. व्हिपपासून शिंदे यांना गटनेते पदी निवड करण्यापर्यंत सगळ्याच घटनाना विरोधी ठरवले आहे. सोळा आमदार कोणत्याही क्षणी अपात्र ठरविले जातील, अशी स्थिती आहे. बेकायदेशीर सरकारचे आदेश प्रशासनानं पाळू नयेत. भविष्यात खटले दाखल होतील, असे मत मी व्यक्त केले. हा अपराध आहे का? सरकारने थेट गुन्हाच दाखल केला. मी कारवाईला घाबरत नाही. लोकशाही आणि स्वातंत्र्याचा महाराष्ट्रात साफ कचरा झाला आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीशी लढावेच लागेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
नाशिक पोलिसांनी माझ्या विरोधात भा. द. वि. कलम 505(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर मुख्यमंत्री व गृहमंत्री महोदयांचा दबाव होता. माझा गुन्हा काय? सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर सरकारचे "गठन"बेकायदेशीर ठरले आहे . व्हिप पासून शिंदे यांना गटनेते पदी… pic.twitter.com/I3jqIT8BuH
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 15, 2023