एक्स्प्लोर

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक, राज्यात पुराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हालचाली

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यामध्ये उद्या महत्वाची बैठक होणार आहे. सांगली, सातारा परिसरात 2019 सालच्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 

मुंबई : सातारा, सांगली भागात 2019 मध्ये आलेल्या पुराची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून महाराष्ट्र सरकार आधीच हालचाली करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना भेटणार आहेत. या भेटीत महाराष्ट्र राज्याच्या भीमा व कृष्णा खोऱ्यातून सोडला जाणारा विसर्ग व त्याच्या माहितीचे आदान- प्रदान यासाठीची यंत्रणा, दोन्ही राज्याच्या धरण व्यवस्थापन व पूर नियंत्रणाबाबत संयुक्त आराखडा व कार्यप्रणाली निश्चित करणे, कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणातून पाणी साठवणे व पाणी सोडण्याचे नियोजन, पूर नियंत्रण व व्यवस्थापनासाठी विविध स्तरावरील कार्यपद्धतीची चर्चा व इतर मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.

अलमट्टीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील अनेक भागांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. म्हणूनच या पूरनियंत्रणाचं काम महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या समन्वयाने करणे आवश्यक आहे. 2019 महाराष्ट्रमध्ये पूर आल्यावर कर्नाटक सरकार पाणी सोडल्यानंतर सांगली कोल्हापूरमधील पाणी ओसरलं होत .पण तोपर्यंत या भागात मोठं नुकसान झालं होतं.

दरवर्षी कोल्हापूर, सांगली भागाला पुराचा धोका असतो. म्हणून यावर्षी आधीच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबरोबर राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांची शनिवारी बैठक होणार आहे. यासाठी जयंत पाटील कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्याबरोबर जलसंपदा विभागाचे सचिव आणि अधिकारी देखील जाणार आहेत.

कृष्णेचा महापूर त्यासाठी अलमट्टीच्या पाण्याचे नियोजन हे महाराष्ट्रासाठी महत्वाच आहे. दरवर्षी पावासळ्यात महाराष्ट्रात आणि कर्नाटकच्या कृष्णा खोऱ्यातील जनतेला फटका बसतो. हे नुकसान होणार नाही यासाठी पूरनियंत्रणाच्या कामात दोन्ही राज्यांनी समनव्य ठेवणे आवश्यक आहे. यासाठी ही बैठक महत्वाची आहे.

याआधी जलसंपदा विभागाच्या सचिव स्तरावर बैठक पार पडली आहे आणि आता दोन्ही राज्यांच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक होणार आहे. पूर परिस्थिती उदभवण्याच्या आधीच दोन्ही राज्यात योग्य संवाद असल्यास आपत्ती टाळता येण्यासाठी महाराष्ट्र सरकार आधीच प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Kambli Love Story : रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
Ind vs Aus 2nd Test Travis Head : सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abu Azmi Left MVA : विरोधकांचा आमच्याशी काही संबंध नाही, अबू आझमींचा मविआवर गंभीर आरोपSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखलSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्रीOpposition Left MLA Oath Ceremony : आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु होताच विरोधकांकडून सभात्याग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Kambli Love Story : रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
रिसेप्शनिस्ट नोएला लुईस ते फॅशन मॉडेल अँड्रिया हेविटपर्यंत! विनोद कांबळीच्या व्यक्तीगत आयुष्यातील प्रेमाची सुद्धा शोकांतिका
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
शरद पवारांनी मारकडवाडीत केलेला विकास पाहावा, त्याचबरोबर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, लुटलेल्या जमिनी पाहाव्यात, राम सातपुतेंचा हल्लाबोल
Ind vs Aus 2nd Test Travis Head : सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
सिराज अन् पंतची चूक टीम इंडियाला पडली महागात.... ट्रॅव्हिस हेडचा तांडव, ठोकले तुफानी शतक
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
तळपायाची आग मस्तकात गेली; अजित पवारांची जप्त संपत्ती मोकळी होताच अंजली दमानियांनी सगळंच काढलं
आता प्रति सरकार बनवा, शरद पवारांना 6 महिने पंतप्रधान करा, तर उरलेली  साडेचार वर्ष राहुल गांधींना द्या, पडळकरांचा खोचक टोला  
आता प्रति सरकार बनवा, शरद पवारांना 6 महिने पंतप्रधान करा, तर उरलेली साडेचार वर्ष राहुल गांधींना द्या, पडळकरांचा खोचक टोला  
Mithali Raj on Her Marriage : 'मला आवडतो त्याचं लग्न झालंय', वयाच्या 42व्या वर्षी अजूनही सिंगल, मिताली लग्नाबद्दल नेमकं म्हणाली तरी काय?
'मला आवडतो त्याचं लग्न झालंय', वयाच्या 42व्या वर्षी अजूनही सिंगल, मिताली लग्नाबद्दल नेमकं म्हणाली तरी काय?
Eknath Shinde : मंत्रिपदांवरून चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता!
मंत्रिपदांवरून चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता!
Samajwadi party quits MVA: मविआकडून सभात्याग करत वातावरणनिर्मिती, अबू आझमींकडून पहिल्याच दिवशी सेटबॅक, एकट्यानेच शपथ घेत दिला धक्का
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबु आझमींचा धमाका, समाजवादी पक्षाचे आमदार मविआतून बाहेर पडण्याच्या तयारीत
Embed widget