एक्स्प्लोर

केंद्राकडून लस उपलब्ध झाल्यास साप्ताहिक लसीकरण योजना राबवणं शक्य, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

आर्थिदृष्ट्या मागास आणि स्मार्टफोन नसलेल्या नागरिकांचं थेट लसीकरण करण्याचे निर्देश जारी केल्याचे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं आहे. 

मुंबई : केंद्र सरकारकडून मुबलक लसींचा पुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्यास विविध जिल्ह्यांसह मुंबईतही साप्ताहिक लसीकरण योजना राबवता येतील, तसेच विशिष्ट वेळेच्या लसीकरणासाठी बुकिंक स्लॉटही सुरू करता येतील, अशी माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे.

कोरोनावरील प्रतिबंधित लस घेता यावी, त्याचा कोणताही काळा बाजार होऊ नये, म्हणून केंद्र सरकारच्यावतीने 'कोविन पोर्टल'ची सुरुवात करण्यात आली. मात्र, या पोर्टलमधील अनेक त्रुटींविरोधात अँड. जमशेद मास्टर आणि अँड. अनिता कॅस्टॅलिनो यांनी उच्च न्यायालयात धाव घेत एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सुनिल देशमुख आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. 

याआधी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान, हायकोर्टानं मुंबईतील लसीकरण स्लॉट बुक करण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारला या प्रक्रियेत सुलभता आणण्याबाबत सूचना देण्यास सांगितलं होते. त्यानुसार, राज्य सरकारच्यावतीने आरोग्य सेवा आयुक्त संचालका साधना तायडे यांच्यामार्फत हे प्रतिज्ञापत्रात सादर करण्यात आले. दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, राज्य सरकार विविध जिल्ह्यासह मुंबई शहरात साप्ताहिक लसीकरण योजना हाती घेईल. मात्र, केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा निश्चित वेळेस उपलब्ध झाल्यास ही योजना लसींच्या उपलब्धतेनुसार अंमलात आणली जाईल, असं राज्य सरकारनं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

लसींचा जिल्हानिहाय पुरवठा करताना जिल्ह्यावार सक्रिय रुग्णांची संख्या, कोविड लसीची कार्यक्षमता, सक्रिय रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट, लसीच्या दुसऱ्या डोससाठी प्रलंबित असणाऱ्या लाभार्थीची संख्या आणि उपल्बध असलेला लसींचा साठा या घटकांचा विचार करण्यात येईल असंही आरोग्य विभागानं यात नमूद केलं आहे. राज्य सरकारकडून सर्व जिल्हा आणि पालिका प्रशासनांना सुचना देण्यात येतील की, विशिष्ट वेळ ठरवून लसीकरणाच्या बुकिंगचे स्लॉट जाहीर करण्यात यावेत, जेणेकरून केंद्रावर लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळता येईल. तसेच 18 ते 44 वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देशही जिल्हा प्रशासनाला राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच 7 जूनच्या केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना अथवा स्मार्ट फोन नसलेल्या नागरिकांचे लसीकरण थेट केंद्रावर देण्याची सोय करण्यात यावी, असेही निर्देश जारी केल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget