32 वर्षांच्या कारकिर्दीत सलमान खान पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार
पहिल्यांदाच तो दुसऱ्या खऱ्या आयुष्यात होऊन गेलेल्या व्यक्तिरेखेवरच्या सिनेमात त्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.
मुंबई : कलाविश्वात सलमान खानचं करिअर मोठं आहे. सलमानने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. यात कॉमेडी, अॅक्शन, ट्रॅजेडी, इमोशनल अशा सिनेमांचा समावेश होतो. काही सिनेमे चालले. तर काही सिनेमे पडले. पण सलमानने एक जॉनर मात्र हाताळला नव्हता. तो आहे बायोपिकचा. सलमानने कधी कुणा माणसाच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात त्या माणसाची भूमिका साकारली नव्हती. पण आता सलमान असा एक सिनेमा करणार असल्याचं वृत्त आहे.
दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांचा आगामी एक चित्रपट सलमानने साईन केला आहे. या सिनेमात सलमान खान गुप्तहेराच्या भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचं नाव आहे ब्लॅक टायगर. अजून या सिनेमाचं चित्रिकरण सुरू झालेलं नाही. पण मिळालेल्या माहीतीनुसार साधारण आणखी काही महिन्यांनी सलमान या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरूवात करेल. सध्या सलमान साजिद नाडियादवाला यांची फिल्म करतोय. सलमानला या नव्या सिनेमाची संहिता खूप आवडली असून त्यातला थरार त्याला साकारायचा असल्याचं कळतं. या बद्दल दिग्दर्शक आणि सलमान यांच्यात बोलणं झालं असून, हा ब्लॅक टायगर चित्रपट भारतीय गुप्तहेर राजेंद्र कौशिक यांच्यावरचा आहे. त्यांना ब्लॅक टायगर म्हटलं जायचं.
एका वेबसाईटने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. राजेंद्र कौशिक हे भारताचे सर्वोत्कृष्ट गुप्तहेर होते. त्यांना ब्लॅक टायगर म्हटलं जायचं. शिवाय, राजकुमार गुप्ता गेल्या पाच वर्षापासून या गुप्तहेरावर काम करतायत. त्यांचं जगणं खूपच थरारक होतं. अनेक वर्षं काम केल्यावर आता या सिनेमाची पटकथा ठरली असून, ती सलमानला ऐकवण्यात आली आहे. यातले अनेक प्रसंग खरे असून धक्कादायक आहेत. या सिनेमातून इतिहासातली अनेक पानं नव्यानं रसिकांना पाहता येणार आहेत. सलमानने यात रुची दाखवली असून तो लवकरच यासाठी वेळ देईल असं कळतं.
In Pics : जब मिल बैठेंगे सब यार; LAC वर जाऊन खिलाडी कुमारनं घेतली जवानांची भेट
यात आणखी मिळालेली माहिती अशी, की हा सिनेमा राजेद्र कौशिक यांच्यावर बेतलेला असला तरी या सिनेमाचं नाव ब्लॅक टायगर नसेल. या सिनेमासाठी नवं नाव शोधलं जाणार आहे. शिवाय, सलमान नेहमी सिनेमात सलमान खान म्हणून येतो. पण आता पहिल्यांदाच तो दुसऱ्या खऱ्या आयु्ष्यात होऊन गेलेल्या व्यक्तिरेखेवरच्या सिनेमात त्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. हा काळ 1970 ते 1980 या आसपासचा असणार आहे. आता सिनेमाचं नाव काय असेल ते कळेल काही दिवसांनी.