Market Committee Election : बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी, कुठे बिनविरोध तर कुठे चुरस
Market Committee Election : बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. कुठे निवडणूक बिनविरोध होत आहे तर कुठे चुरस पाहायला मिळत आहे.
Market Committee Election : ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची (Market Committee Election) रणधुमाळी सुरु आहे. कुठे निवडणूक बिनविरोध पार पडली आहे तर कुठे निवडणुकीची चुरस पाहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा समना होणार आहे. त्यामुळं राज्यात अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होणार आहेत.
नायगाव बाजार समितीची निवडणूक बिनविरोध
नांदेड जिल्ह्यातील नायगाव बाजार समितीची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत आमने-सामने आलेल्या काँग्रेस आणि भाजपाने उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी आपल्या तलवारी म्यान केल्या. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. काँग्रेसनं 10 जागा तर भाजपाने 6 जागांवर तडजोडी करुन ही निवडणूक बिनविरोध काढली. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानं जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी मविआ विरुध्द भाजप-शिवसेना
मराठवाड्यातील बहुतांश बाजार समित्यांत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना युतीत थेट लढती होणार आहेत. अनेक उमेदवारांनी गुरुवारी
मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळं या ठिकाणी थेट लढती होणार आहेत. आज उमेदवारांना चिन्ह मिळाल्यावर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. हिंगोलीत राष्ट्रवादीला बाजूला ठेवून काँग्रेस, ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी पॅनल तयार केलं आहे. औरंगाबाद, परभणी, नांदेड, लातूर याठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि शिवसेना यांच्या पॅनेलमध्ये थेट लढत होत आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समित्या होत्या. त्यांना आता भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं चांगलंच आव्हान दिलं आहे.
धुळे जिल्ह्यात भाजप विरुद्ध मविआ अशीच लढत
धुळे जिल्ह्यातील चारही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या पॅनलमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चारही बाजार समितीच्या 68 जागांसाठी माघारीअंती 156 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून 527 उमेदवारांनी माघार घेतली आहे. तर दोंडाईचा आणि धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येकी दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकांची चुरस आता अधिक वाढणार असून काल माघारीच्या शेवटच्या दिवशी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून 252 उमेदवारांनी माघार घेतली यातील दोन जागा बिनविरोध झाले असून एक जागा भाजप आणि एक जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे. आता उर्वरित 16 जागांसाठी 39 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर साक्री कृषी उत्पन्न बाजार समिती 18 जागांसाठी 41 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत जय किसान आणि परिवर्तन पॅनलमध्ये लढत होणार आहे. दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील दोन जागा बिनविरोध झाल्या असून, या ठिकाणी आमदार जयकुमार रावल आणि माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्या पॅनलमध्ये मुख्य लढत होणार आहे.
शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी विविध गटातून 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. या ठिकाणी 18 जागांसाठी 42 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आमदार अमरीश पटेल यांच्याविरोधात महाविकास आघाडीने शेतकरी बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अमरीश पाटील यांनी 18 जागांवर 15 नवीन उमेदवार दिले असून उर्वरित तीन उमेदवारांना आमदार अमरीश पटेल हे पाठिंबा देणार आहेत.
वर्धा जिल्ह्यात सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 259 उमेदवार रिंगणात
वर्धा जिल्ह्यात सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 259 उमेदवार रिंगणात आहेत. सात उमेदवारांची बिनविरोध निवड. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक 45 उमेदवार रिंगणात आहेत.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी
राज्यामध्ये भाजपविरोधात वज्रमुठ बांधणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये सांगलीत मात्र बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने (Sangli Agriculture Product Market Committee) बिघाड झाला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये भाजप विरोधात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली आहे. भाजप विरोधात महाविकास आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, शिवसेना उध्दव ठाकरे गटाला डावलण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीवर सडकून टीका देखील करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: