Maharashtra LIVE Updates : हिंगोली तिहेरी हत्याकांडातील आरोपीला चार दिवस पोलीस कोठडी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
Hingoli : हिंगोली तिहेरी हत्याकांडातील आरोपीला चार दिवस पोलीस कोठडी
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वाणी गावामध्ये तिहेरी हत्याकांड घडले होते, स्वतःच्याच मुलाने आई वडील आणि भावाला ठार मारून अपघात केल्याचा बनाव केला होता. या प्रकरणी आरोपी महेंद्र जाधव याला आज बासंबा पोलिसांनी हिंगोलीच्या न्यायालयामध्ये हजर केले असता हिंगोली कोर्टाने त्याला पुढील चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
Vasai News : MSEB अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
वसई : एम.एस.ई.बी.चा कनिष्ठ अभियंता राजेश रविशंकर गुप्ता याला दोन हजाराची लाच घेताना ठाण्याच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. फिर्यादीकडून दुकानाला लाईटचे दोन मिटर लावून देण्याकरीता त्याने दोन हजार लाचेची मागणी केली होती. फिर्यादीने याबाबत तक्रार ठाणे लाच लुचपत विभागाला केल्यावर ठाण्याच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून, सोमवारी दुपारी तीन वाजता दोन हजार घेताना रंगेहाथ गुप्ताला पकडलं. मंगळवारी राञी अडीज वाजता त्याच्यावर नायगांव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, राजेश गुप्ता याला अटक करण्यात आली आहे. राजेश गुप्ता याला याआगोदरही लाच घेताना अटक करण्यात आली होती. आता ही त्याची दुसरी वेळ आहे.
Nylon Manja : मुंबईत मांज्यामुळे 800 पक्षी जखमी,
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीनिमित्त रविवारसह सोमवारी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात आलेल्या धारदार मांजामुळे (Nylon Manja) 800 पक्षी जखमी झाले आहेत. चर्चगेटपासून विरारपर्यंत घडलेल्या घटनांतील जखमी पक्ष्यांचा हा आकडा असून, दहिसर, कांदिवली, मालाड, बोरीवली पट्ट्यात अधिक पक्षी जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. धारदार मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार करण्यासाठी रविवारी आणि सोमवारी वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पतंगाचा मांजा अनेकवेळा झाडांसह तारांमध्ये अडकतो आणि हा मांजा पक्ष्यांसह मनुष्यालाही हानिकारक असतो ज्यामुळे असे अपघात होतात. दरम्यान, मुंबईच्या लोअर परळ येथील बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट हॉस्पिटल येथे अनेक जखमीला पक्षांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.
Manoj Jarange Patil : सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे, मनोज जरांगेचा गंभीर आरोप
Maratha Reservation Updates : सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे याची मला खात्रीलायक माहिती, असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी सरकारवर केला आहे. 'समाज सध्या संकटात आहे. काहींच्या मुंबईत, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगरला कानाकोपऱ्यात बैठका होऊ लागल्यात, एकदा आरक्षण मिळाल्यानंतर मी डोंगरात किंवा हिमालयात जाईन. हिंसाचार सुद्धा हीच मंडळी घडून आणणार आणि डाग मराठ्यांना लावणार', असं जरांगेनी म्हटलं आहे.
Manoj Jarange Patil : माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, मनोज जरांगेचा सरकारवर गंभीर आरोप
जालना : माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी सरकारवर केला आहे. सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे, याची मला खात्रीलायक माहिती असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समन्वयकांवरती नाव न घेता गंभीर टीका केली आहे. 'मराठा समाजाच्या नावावर, जीवावर, राजकारण करणारे, मोठे झालेले अशा काही असंतुष्ट आत्म्यांना आरक्षण विषय कायमचा संपून द्यायचा नव्हता, त्यांना मी आतून खपत नाही, अशा लोकांना सरकार हाताशी धरत आहे, सरकारने काही मंत्र्यांनी त्यांना हाताशी धरलंय', असं म्हणत जरांगेंनी निशाणा साधला आहे.