एक्स्प्लोर

Akola Rain Updates: अकोल्यात धुवांधार पाऊस; पुरात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल तेरा तासांनी सापडला

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

LIVE

Key Events
Akola Rain Updates: अकोल्यात धुवांधार पाऊस; पुरात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल तेरा तासांनी सापडला

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा 

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे. 

19:37 PM (IST)  •  13 Jul 2023

Raj Thackarey: 'तर मतदानाला काही अर्थ उरणार नाही', खेडमध्ये राज ठाकरे यांची तुफान फटकेबाजी 

Raj Thackarey: राज ठाकरे यांनी खेड मधील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना महराष्ट्रातील राजकारणावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'राजकारणाचा जो चिखल झाला आहे त्या चिखलामध्ये सर्वांना घालायचं की काही नवनिर्माण करायचं हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवायचं आहे.' तर कोकणतला रस्ता गेली 17 वर्ष का रखडला हा सवाल देखील राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.  

13:04 PM (IST)  •  13 Jul 2023

Akola Rain Updates: अकोल्यात धुवांधार पाऊस; पुरात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल तेरा तासांनी सापडला

Akola Rain Updates: अकोल्यात रात्री धुवांधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसानं खैरमोहम्मद प्लॉट भागातील ओढ्याला पूर आला होता, याच पुरामध्ये जियान अहमद एकबाल अहमद हा चिमुकला वाहून गेला होता. Read More
12:30 PM (IST)  •  13 Jul 2023

Pune Accident : गिरवली येथे भीमाशंकर- कल्याण बसचा अपघात; बस पुलावरून खाली कोसळली, पाच जण जखमी

भीमाशंकर-कल्याण एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली गावाजवळ झाला आहे. Read More
12:29 PM (IST)  •  13 Jul 2023

संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण; आरोपी माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि एपीआय राहुल राऊतच्या तपासातून कोणती माहिती समोर आली?

संतोष शिंदे यांनी आत्महत्या केल्यानंतर माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि राहुल राऊत फरार झाले होते. त्यांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. Read More
12:19 PM (IST)  •  13 Jul 2023

Maharashtra Shiv Sena News: शिवसेनेचे यशवंत जाधव छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल

Maharashtra Shiv Sena News: शिवसेनेच्या यशवंत जाधव यांना छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात केलं दाखल

यशवंत जाधवांवर सैफी रुग्णालयात सुरु आहेत उपचार 

यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी जाधव या आमदार आहेत तर यशवंत जाधव हे माजी स्थायी समिती अध्यक्ष राहिले आहेत

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget