Pune Accident : गिरवली येथे भीमाशंकर- कल्याण बसचा अपघात; बस पुलावरून खाली कोसळली, पाच जण जखमी
भीमाशंकर-कल्याण एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली गावाजवळ झाला आहे.
Pune Accident : पुणे जिल्ह्यात अपघाताचं प्रमाण काही (Pune Accident ) संपायचं नाव घेत नाही आहे. भीमाशंकर-कल्याण एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली गावाजवळ झाला आहे. अपघातातील जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघात भीषण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भीमाशंकर येथे जाणारी एस टी बस MH 14 BT 1582 ही गिरवली गावच्या हद्दीत पुलावरून खाली कोसळल्याची घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एसटी बस मधील दोन प्रवासी जखमी झाले असून इतर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका चालक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांनी दिली.
अपघात होताच 108 नियंत्रण कक्षाला फोनवरुन माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाच रुग्णवाहिका अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. बसला झालेल्या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या बसमध्ये एकून 35 प्रवासी होते. त्या सगळ्या प्रवाशांसाठी ही सकाळ धोक्याची ठरली असती मात्र नशीब बलवत्तर म्हणून सगळ्यांचे जीव वाचले.
अपघाताचं सत्र संपेना...
यापूर्वी पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बसचा अपघात झाला होता. यात सर्व प्रवासी सुरक्षित बचावले होते. पुणे-नाशिक महामार्गावर मोठा अनर्थ टळला होता. नारायणगाव जवळ एसटी बसचा स्टेअरिंग फ्रीज झाल्याने हा अपघात झाला होता. सत्तरहून अधिक प्रवाशांचा जीव धोक्यात होता.महामार्ग सोडून एसटी खाली उतरली होती. पुढं मोठा खड्डा होता.अचानक घडलेल्या या प्रकारात एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवले आणि कसंबसं बसवर ताबा मिळविण्यात त्यांना यश आलं होतं.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अनेक प्रवाशांना इजा पोहचली होती. गेल्या काही दिवसांपासून बसच्या अपघातांचं प्रमाण जास्त वाढत आहे. या अपघातांची नेमकी कारणं शोधून काढण्याची गरज आहे.
हेही वाचा-