Maharashtra Politics: शिवसेना, राष्ट्रवादी आता काँग्रेसचा नंबर? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने खळबळ
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
04 Jul 2023 08:52 PM
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरातून तडकाफडकी मुंबईला रवाना; चर्चांना उधाण
CM Eknath Shinde: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे नागपुरात स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
Read More
Maharashtra Politics: शिवसेना, राष्ट्रवादी आता काँग्रेसचा नंबर? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने खळबळ
Maharashtra Politics: सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय महानाट्यामध्ये काँग्रेसच्या चर्चांनी देखील आता जोर धरला आहे. तसेच काँग्रेस पक्ष देखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हटलं जात आहे.
Read More
Lohagad fort: लोहगडावर पर्यटकांची तोबा गर्दी; चार तास लोक महादरवाज्यात अडकले; व्हीडिओ व्हायरल
Lonavala: पावसाळा सुरू झाल्याने विकेंडला पर्यटनस्थळांवर कायम गर्दी असते, त्यामुळे शनिवारी आणि रविवारी फिरायला जाताना खबरदारी घेतली पाहिजे.
Read More
Sharad Pawar Or Ajit Pawar : पवार साहेब की अजित दादा! दोन्ही गटाकडून फोनाफोनी सुरू; कार्यकर्ते संभ्रमात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्या गटासोबत राहायचं यावरुन चांगलीच गोची झाली आहे. पदाधिकाऱ्यांचा शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत थेट कनेक्ट आहे. त्यामुळे निर्णय घेण्यास अवघड जातंय.
Read More
Sangli News: गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाख रुपये दे...नाहीतर लग्न होऊन न देण्याची धमकी; नैराश्याच्या गर्तेत तरुणाने उचलले टोकाचे पाऊल
Sangli News: गुन्हा मागे घेण्यासाठी पाच लाखांची मागणी आणि लग्न जमू न देण्याच्या धमकीने नैराश्यात अडकलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचललं असल्याची घटना समोर आली आहे.
Read More
Nashik NCP : नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वाद, शरद पवार समर्थकांकडून घोषणाबाजी, तर भुजबळ समर्थक कार्यालयात
Nashik Political News : अखेर नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये वादाला तोंड फुटले असून राष्ट्रवादी भवन कार्यालयासमोर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
Read More
छत्रपती संभाजीनगर शहरात पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई; पोलीस आयुक्तांनी काढले आदेश
Chhatrapati Sambhaji Nagar News : सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक लोकांना जमण्यास मनाई करण्यात आली आहे. 4 जुलै ते 18 जुलैपर्यंत हे आदेश लागू असणार आहे.
Read More
विकृतपणा! 10 वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य; संभाजीनगरच्या वाळूज उद्योगनगरीतील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी दोन विकृत तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
Sharad Pawar NCP : ठरलं! लवकरच शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा; सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून, जयंत पाटीलांची माहिती
Sharad Pawar Nashik : शरद पवार हे महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.
Read More
Nashik Politics : आम्ही अजित पवार, छगन भुजबळांसोबत; नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयावर अजित पवार गटाचा ताबा
Nashik Politics : नाशिकमध्ये (Nashik) अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयावर ताबा घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
Read More
Pune Crime News : दुबई विमानातून उतरली, पळ काढण्याच्या तयारी होती, पण...; पुणे विमानतळावरच महिलेकडून 20 लाखांचं सोनं जप्त
दुबईहून स्पाईसजेट फ्लाईटने पुण्यात आलेल्या (Pune Crime news ) एका महिला प्रवाशाकडून 20 लाख रुपयांचे 423 ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले आहे.
Read More
Pravin Darekar BJP : शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला असताना, भाजप राष्ट्रवादीच्या संपर्कात; प्रवीण दरेकरांचा मोठा गौप्यस्फोट
Pravin Darekar BJP : शिंदे गटाचे आमदार (shivsena) हे जेव्हा गुवाहाटीला गेले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपसोबत जाण्यासाठी तयार होते.
Read More
साधेपणा... ना सरकारी गाडी, ना जंगी स्वागत; पदभार सोडल्यावर केंद्रेकर पत्नीसह पायीच निघाले
Sunil Kendrekar Retired : यावेळी त्यांनी कुठल्याही शासकीय गाडीचा वापर न करता साधेपणाने आपल्या पत्नीसह पायी जात विभागीय आयुक्त ते शासकीय निवास्थान गाठले.
Read More
Marathwada Accident : अपघातांच्या मालिकेने मराठवाडा हादरला! पाच अपघातांमध्ये 9 जण ठार, तर 23 जखमी
Marathwada Accident News : यातील सर्व जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. यात काहींची प्रकृती गंभीर आहे.
Read More
Nashik Chhagan Bhujbal : 'आमचा नेता हाच आमचा पक्ष' भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, पक्षाकडून नेत्यांवर कारवाई, कार्यकर्ते संभ्रमातच...
Nashik NCP : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर नाशिकमधील राष्ट्रवादीमध्ये अनेक घडामोडी होत आहेत.
Read More
'औरंगजेबाला मी आदर्श मानतो'; राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेल्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील सुभेदारी विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बीआरएस पक्षाच्या पत्रकारपरिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
Read More
President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून विदर्भ दौऱ्यावर; नागपूरसह गडचिरोलीतील कार्यक्रमांना उपस्थित राहणार
President Draupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज विदर्भ दौऱ्यावर असून राष्ट्रपतीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदर्भ दौरा आहे.
Read More
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट
राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक
राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.
काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.
मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश
राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली. ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.