एक्स्प्लोर

'औरंगजेबाला मी आदर्श मानतो'; राष्ट्रवादीतून बीआरएसमध्ये आलेल्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरातील सुभेदारी विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बीआरएस पक्षाच्या पत्रकारपरिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar News : मागील काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या (Aurangzeb) मुद्यावरून वातावरण तापले आहे. तर काही ठिकाणी यावरून हिंसाचाराच्या घटना देखील समोर आले आहे. विशेष म्हणजे याच मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होतांना दिसून आले. दरम्यान, अशातच राष्ट्रवादी पक्षातून बीआरएसमध्ये आलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कदीर मौलाना यांनी 'आपण औरंगजेबाला आदर्श मानतो' असे वक्तव्य केले आहे. शहरातील सुभेदारी विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या बीआरएस पक्षाच्या पत्रकारपरिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

काय म्हणाले कदीर मौलाना? 

सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या बीआरएस पक्षाच्या पत्रकार पत्रकारपरिषदेत बोलतांना कदीर मौलाना म्हणाले की, "औरंगजेब हा चांगला राजा होता. औरंगजेब राजा असताना त्याने अनेक मंदिरांना जागा उपलब्ध करून दिले. तुम्ही कोणाबाबत बोलतात, काही इतिहास माहित नाही. औरंगजेबाने कधीच जातीवाद केला नाही. औरंगजेबाच्या राज्यात गंगा जमुना व्यवस्था नांदत होती. त्यावेळी सत्तेची लढाई होती आणि ती आज देखील सुरु आहे. औरंगजेब एक असा राजा होता ज्याने अखंड भारतावर 50 वर्षांपेक्षा अधिक काळ राज्य केले. तर नक्कीच मी औरंगजेबाला आदर्श मानतो. त्यांनी भारतात राज्य केले असून, नक्कीच तो आदर्श आहे. 

भाजपवर टीका... 

दरम्यान यावेळी कदीर मौलाना यांनी भाजप देशात मॉब लिंचिंगच्या माध्यमातून, ईडीच्या माध्यमातून, इन्कमटॅक्सच्या माध्यमातून देशात गोंधळाची स्थिती निर्माण करत आहेत. दादागिरी करून, सत्तेचा उपयोग करून लोकांना घाबरून इतर पक्षांना दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जनतेने विचार करायला विकास कोणता पक्ष करणार आहे. 

नव्या वादाला तोंड फुटणार...

एकीकडे राज्यात औरंगजेबाच्या मुद्यावरून वातावरण तापले असतानाच, दुसरीकडे कदीर मौलाना यांनी आपण औरंगजेबाला आदर्श मानत असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तर यावरून बीआरएस पक्षावर देखील टीका होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कदीर मौलाना यांच्या या वक्तव्यावरून बीआरएस पक्षातील अनेकजण नाराज असल्याचे देखील बोलले जात आहे. 

कोण आहेत कदीर मौलाना? 

कदीर मौलाना हे गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षात सक्रीय होते. छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील एक महत्वाचे मुस्लीम नेते म्हणून त्यांची पक्षात ओळख होती. तर राष्ट्रवादीकडून त्यांना प्रदेश उपाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते नाराज होते. त्यामुळे त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

प्रकाश आंबेडकर काय तुमचे बाप आहेत का? हिंमत असेल तर गुन्हा दाखल करा; औरंगजेबावरून खा. जलील यांची सरकारवर टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
Embed widget