एक्स्प्लोर

जळगावचा यश महाले, NDA मध्ये चमक दाखवली, प्रशिक्षणावेळी गंभीर दुखापत; देशाने भावी लेफ्टनंट कर्नल गमावला

Jalgaon Newsखडतर मेहनत घेऊन ही त्याला देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही  दुर्दैवी घटना घडल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

जळगाव:  सैन्य प्रशिक्षण (Military Training) घेत असताना जखमी झालेल्या भावी लेफ्टनंट कर्नलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूच्या बातमीनंतर जळगाव (Jalgaon News)  जिल्ह्यातील  चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. यश गोरख महाले असे मृत कॅप्टनचे नाव आहे. 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील कॅप्टन यश गोरख महाले (Yash Mahale)  हे नुकताच भारतीय सैन्यात भरती झाला होता. भरतीनंतर पुणे येथील खडकवासला सैन्य प्रशिक्षण केंद्रात (National Defence Academy) प्रशिक्षण घेत असताना बॉक्सिंग खेळत असताना त्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्याच्यावर पुण्याच्या सैन्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

दोन दिवसापूर्वी ही घडली होती. यश गोरख महालेवर त्याच्या मूळ गावी म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी गावात त्यांच्या पर्थिवाची  अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंत्य संस्कारासाठी हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सैन्यदलात भावी काळात लेफ्टनंट कर्नल पदाची स्वप्ने पाहणाऱ्या जवानाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही  दुर्दैवी घटना घडल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त आहे.

घटनेची सखोल चौकशी करावी

जवानाच्या मृत्यूनंतर त्यांचे मामा डॉ. हेमंत शेवाये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, लहानपणापासून यशला सैन्यात दाखल होऊन देश सेवा करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने खूप खडतर परिश्रम घेतले. त्यानंतर तो सैन्य दलात दाखल झाला. मात्र प्रशिक्षण काळात त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खंत आहे. सैन्यात शत्रूशी लढताना शहीद झाला असता तर अभिमान वाटला असता. मात्र एवढी खडतर मेहनत घेऊन ही त्याला देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही  दुर्दैवी घटना घडल्याची खंत आहे. यशला तर आम्ही गमावले आहे. परंतु अशी  घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने या घटनेची सखोल चौकशी करावी आणि पुन्हा अशा घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. 

हे ही वाचा :

Israel Gaza Attack : अ‍ॅपल वॉचच्या मदतीने शोधला मुलीचा मृतदेह, वडीलांनी सांगितला काळीज पिळवटून टाकणारा अनुभव

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
Embed widget