Maharashtra School Uniform : मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य, एक गणवेश'; शासन निर्णय जाहीर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
18 Oct 2023 08:59 PM
Toll on ST Bus : सरकार एसटी टोल माफी कधी देणार? महामंडळाला आर्थिक तुटीतून बाहेर काढण्यासाठी मागणी
ST Bus Toll : एसटी महामंडळाच्या बसेसना टोल माफी दिल्यास आर्थिक तुटीतून बाहेर येण्यास मोठा हातभार लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. Read More
Maharashtra School Uniform : मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य, एक गणवेश'; शासन निर्णय जाहीर
Maharashtra School Uniform : राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान एक रंगाचा गणवेश असणार आहे. Read More
Shiv Sena : शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखंसोबत ओल्या पार्ट्या करतात; बुलढाण्यात शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप
Shiv Sena Buldhana : बुलढाण्यातील शिवसेना शिंदे गटातील गटबाजी जोरात असल्याचे चित्र आहे. विद्यमान जिल्हाप्रमुखांवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत. Read More
निधी आणला, परिसर हिरवा केला, आता तरी शहाजीबापूंचं लीड वाढवणार की नाही? भाजप खासदाराचा सवाल
Maharashtra Politics: सांगोला तालुक्यातील कोळा येथे बापुंच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीसाठी निंबाळकर आले होते. त्यावेळी बापूंचं मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करा, असं Read More
पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका, ललित पाटीलचा कोर्टात दावा, सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
Sasoon Hospital Drug Racket: ललित पाटीलला न्यायालयात हजर केल्यानंतर पुणे पोलिसांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा ललित पाटीलकडून करण्यात आला. Read More
Lalit Patil Arrested : इकडे ललित पाटीलचे गौप्यस्फोट, तिकडे सुषमा अंधारेंनी वात पेटवली, दुसऱ्या नेत्याचंही नाव घेतलं!
Lalit Patil Arrested : ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत (Lalit Patil) दादा भुसे आणि शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांची देखील नार्को टेस्ट करा, सुषमा अंधारेंकडून पुन्हा आरोप Read More
Lalit Patil Arrested: मला पळवण्यात कोणा कोणाचा हात लवकरच सांगणार; जेरबंद ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट
Lalit Patil Arrested: साकीनाका पोलीस स्थानकातून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयाच्या दिशेनं जात असताना, मी पत्रकारांशी लवकरच बोलीन, असं ललित पाटील म्हणाला. Read More
Lalit Patil Arrested: ड्रग माफीया ललित पाटील माझाच्या कॅमेऱ्यात कैद
Lalit Patil Arrested: ड्रग माफिया ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केली असून सध्या त्याला अंधेरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी जेरबंद ललित पाटील माधाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मी पत्रकारांशी बोलीन, अशी प्रतिक्रिया ड्रग माफिया ललित पाटीलनं दिली आहे.
दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात जरांगे पाटील मुंबापुरीत, मराठा संघटना, समाजबांधवांच्या भेटीगाठी घेणार
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत, यादरम्यान ते मराठा संघटना आणि मराठा समाजबांधवांच्या भेटीगाठी घेणार आहेत. Read More
ती' 2 कारणे, ज्यामुळे ड्रीम इलेव्हनवर करोडपती झालेल्या PSI झेंडेंना वर्दी उतरवावी लागली!
पीएसआय सोमनाथ झेंडेंचे अखेर निलंबन (PSI Suspended) करण्यत आली आहे. झेंडेंनी केलेल्या दोन चुकांमुळे त्यांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. Read More
Buldhana News: मध्यप्रदेश निवडणुकीचं बिगुल वाजलं अन् बुलढाण्यातील सीमेवर कडेकोट बंदोबस्त; पोलिसांकडून वाहनांची तपासणी
Buldhana News: मध्यप्रदेश निवडणुकीचं बिगुल वाजलं अन् बुलढाण्यातील सीमेवर कडेकोट बंदोबस्त; पोलिसांकडून वाहनांची तपासणी Read More
Meera Borwankar : मीरा बोरवणकरांच्या 'त्या' कामगिरीवर आधारित 'हा' सिनेमा; राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत
Meera Borwankar : मीरा बोरवणकरांच्या कामगिरीवरुन प्रेरित होऊन 'मर्दानी' (Mardaani) या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. Read More
देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की, हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे; संजय राऊतांचा आरोप, व्हिडीओ ट्वीट
Maharashtra Politcs: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोरच पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. Read More
Mumbai Pollution : मुंबईकरांनो काळजी घ्या! मुंबईतील हवेचा दर्जा खालावला, धुलीकणांचं प्रमाण अतिधोकादायक पातळीवर
मुंबईत पावसाळ्यात धूळ कमी प्रमाणात उडते त्यामुळे हवा बऱ्यापैकी चांगली असते. पण ऑक्टोबरमध्ये मुंबईतल्या हवेची गुणवत्ता मॉडरेट श्रेणीत दिसत आहे Read More
जळगावातील गोंडगाव पीडितेच्या कुटुंबास आर्थिक मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांचा निधी मंजूर
Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला. या घटनेनं जळगावसह संपूर्ण राज्य हादरलं. Read More
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -