एक्स्प्लोर

Meera Borwankar : मीरा बोरवणकरांच्या 'त्या' कामगिरीवर आधारित 'हा' सिनेमा; राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत

Meera Borwankar : मीरा बोरवणकरांच्या कामगिरीवरुन प्रेरित होऊन 'मर्दानी' (Mardaani) या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती.

Meera Borwankar Life Base Rani Mukharjee Mardaani Movie : माजी पोलीस आयुक्त (IPS) मीरा बोरवणकर (Meera Borwankar) सध्या चर्चेत आहेत. मीरा यांनी 1994 मध्ये जळगावमधील (Jalgaon) मोठं सेक्स स्कँडल उघडकीस आणलं. तसेच त्या आरोपींवर कारवाई केली. पण आता त्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. मीरा यांनी 'मॅडम कमिशनर' (Madam Commissioner) हे पुस्तक लिहिलं असून या पुस्तकात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पुस्तकावरुन ते वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. पुढे माध्यमांसमोर येत त्यांनी आपली भूमिका मांडली. या 'लेडी सुपरकॉप'वर बॉलिवूडमध्ये एक सिनेमा बनवण्यात आला आहे.

मीरा बोरवणकर देशभरात 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जातात. मीरा या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील आहेत. 1981 बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी (IPS Officer) आहेत. त्यांचे पती अभय बोरवणकर (Abhay Borwankar) हेदेखील आयएएस अधिकारी (IAS Officer) होते. सध्या मात्र ते व्यवसाय करत आहेत.   

मीरा आयपीएस अधिकारी झाल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये त्यांना काम करता आलं. दाऊद इब्राहिम कासकर आणि छोटा राजन टोळीतील अनेकांना तुरुंगात टाकण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण जळगाव येथील सेक्स स्कँडलमुळे त्या खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आल्या. 

'या' घटनेने मीरा बोरवणकर देशभरात चर्चेत आल्या...

मीरा बोरवणकर यांनी 194 मध्ये जळगावातील एक मोठा सेक्स स्कँडल पकडला होता. शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना वेश्याव्यवसाय करण्यात भाग पाडले जात असल्याचं यात उघड झालं. या प्रकरणात मीरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्या देशाभरात चर्चेत आल्या. 

मीरा बोरवणकरांच्या भूमिकेत झळकलेल्या राणी मुखर्जी!

मीरा बोरवणकर यांच्या जळगाव सेक्स स्कँडलमधील कामगिरीने प्रेरित होऊन 'मर्दानी' (Mardaani) या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमात राणी मुखर्जी (Rani Mukharjee) मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमात राणी मुखर्जी यांनी साकारलेल्या पोलिस ऑफिसरचं नाव शिवानी शिवाजी रॉय आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 

'मर्दानी' या सिनेमाचं दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केलं होतं. या सिनेमात राणी मुखर्जी यांच्यासह ताहिर राज भसीन, जिशू सेनगुप्ता, सानंद वर्मा आणि अवनीर कौर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. 2019 मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाच्या तिसऱ्या भागाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. 

संबंधित बातम्या

Ajit Pawar : मीरा बोरवणकरांच्या पुस्तकांमुळे अडचणीत,अजित पवार पहिल्यांच बोलले, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Virat Kohli Ind vs Aus : 'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Santosh Deshmukh Resign : संतोष देशमुखांची क्रुर हत्या, महाराष्ट्राला सुन्न करणारा रिपोर्टZero Hour Uddhav Thackeray:उद्धव ठाकरेंकडून भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्तावZero Hour Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंचा राजीनामा, विरोधकांचे आरोपांवर आरोपSpecial Report Pankaja Munde: पंकजा मुंडेंकडून भावाच्या राजीनाम्याचं स्वागत, राजकीय समीकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Virat Kohli Ind vs Aus : 'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
Embed widget