Maharashtra News LIVE Updates : महायुतीची बैठक संपली! अमित शाह यांची शिंदे-पवारांसोबत बंद दाराआड चर्चा; मविआ नेत्यांचीही बैठक अद्याप सुरुच
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
Sanjay Raut : संजय राऊतांना पुन्हा दिलासा; दादा भुसे बदनामी खटला प्रकरणी पुढची सुनावणी 30 मार्चला होणार
Nashik News : मंत्री दादा भुसे बदनामी खटला प्रकरणी जिल्हा न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना पुन्हा दिलासा दिला आहे. या प्रकरणातील पुढची सुनावणी 30 मार्चला होणार आहे.
Beed Network Problem : मोबाईचे टॉवर नसल्याने ग्रामस्थांचा निवडणूकीवर बहिष्कार, सुरूर्डी ग्रामपंचायतीचा ठराव
Chhagan Bhujbal Live : आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील : छगन भुजबळ
महायुतीत भाजप मोठा पक्ष आहे. चर्चा सुरु असून आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला आहे.
Amit Shah Meeting : शाहांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत वेगळी बैठक
Amit Shah Meeting : अमित शाहांनी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत वेगळी चर्चा केली. राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या जागा देण्यात येणार आहेत, यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अमित शाहांनी चर्चा केली. त्यानंतर या बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.
Parbhani News : राष्ट्रवादी परभणी लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक पार पडली
Parbhani News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परभणी लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते, तेव्हा 38 हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता, तो पराभव हा वंचितच्या उमेदवारामुळे झाला होता. त्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला तब्बल दीड लाख मतं पडली होती. त्यामुळे, आत्ता महायुतीचा उमेदवार म्हणून राजेश विटेकर यांना लोकसभेची उमेदवारी द्या, अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांकडून या बैठकीत करण्यात आली आहे.