Maharashtra News LIVE Updates : लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Election Commission : लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी
Election Commission : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय घेतलाय. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. कोणत्याही कामात लहान मुलांचा वापर करण्याबाबत कडक निर्देश जारी करण्यात आले आहेत. राजकीय पक्षांना पोस्टर्स, पॅम्प्लेट वाटप,प्रचार रॅली आणि निवडणूक सभांसह कोणत्याही स्वरूपात निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर करू नये, असे निर्देश केंद्रिय निवडणूक आयोगाचे सगळ्या राजकीय पक्षांना दिले आहेत.
Pune News : पुणे विद्यापीठातील वादग्रस्त रामायण नाटक प्रकरण
Pune News : पुणे विद्यापीठातील वादग्रस्त रामायण नाटक प्रकरणी पुणे विद्यापीठाकडून स्थापन केलेल्या सत्यशोधक समितीला अजित पवार गटाचा विरोध करण्यात येत आहे. समितीमध्ये जी नावे सध्या समाविष्ट करण्यात आली आहेत, ते समविचार धारेचे असल्याचा अजित पवार गटाचा आरोप आहे. समविचारी सदस्य एकत्र आल्याने निकालावर परिणाम होण्याची अजित पवार गटाने भीती व्यक्त केली आहे. या समितीत दिग्दर्शक नागराज मंजुळे, अतूल पेठे किंवा श्रीरंग गोडबोले यांच्या पैकी दोघांना घेण्याची अजित पवार गटाची मागणी केली आहे. चित्रपट, साहित्य कला आणि सांस्कृतिक विभाग अजित पवार गटाचे प्रमूख बाबासाहेब पाटील यांची विद्यापीठाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.
Mumbai OBC Meeting :
Mumbai OBC Meeting : ओबीसी जनमोर्चाच्या वतीने मुंबईत राज्यस्तरीय बैठकीचा आयोजन करण्यात आला असून या बैठकीमध्ये उपस्थित पदाधिकाऱ्यांना हरकती कशाप्रकारे नोंदवल्या गेल्या पाहिजेत. याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने अधिसूचना काढून कुणबी नोंदी देण्यासंदर्भामध्ये आदेश देण्यात आले होते. यालाच विरोध करत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. ओबीसी समाजाच्या वतीने राज्यभरातून तीन कोटी हरकती पाठवण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तयार करण्याचे देखील सूचना ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे. आजच्या बैठकीच्या निमित्ताने ओबीसी जनमोर्चा यांच्या वतीने एका नव्या पक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Gondia Truck Fire : उभ्या ट्रकला लागली आग, संपुर्ण ट्रक जळून खाक
Ahmednagar News : पारधी समाजाचे नगरमध्ये बोंबाबोंब आंदोलन
Ahmednagar News :अहमदनगरच्या आदीवासी पारधी संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यक्रमासमोर बोंबाबोंब आणि उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलंय. बेलवंडी आणि घारगांव येथील आदिवासी पारधी तसेच दलित समाजातील सुशिक्षित बेरोजगार मुला - मुलींना सेंट्रल बँक , स्टेट बँकेडून तात्काळ कर्ज देण्यात यावे, राजुर प्रकल्प कार्यालयामध्ये दिलेले सहा बचत गटाच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी आदेश देण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागात पारधी समजातील मोठ्या संख्येने युवक सुशिक्षित आहेत. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळत नसल्याने व्यवसायासाठी त्यांनी बॅंकेकडे कर्जाची मागणी केली आहे. पण, त्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नाहीय. याला केवळ ते पारधी समाजाचे असल्याने त्यांना कर्ज मिळत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे, त्यांना तातडीने कर्ज मिळावे आणि महिलांना देखील आर्थिक साहाय्य व्हावे यासाठी महिला बचत गटांना मंजुरी मिळावी, अशी मागणी करत हे आंदोलन सुरू करण्यात आलंय.