Maharashtra News LIVE Updates : वसई विरारच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी काँग्रेसचे आंदोलन, पालिकेच्या कार्यालया समोर बेमुद्दत आमरण उपोषण
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Congress Hunger Strike : वसई-विरारमध्ये काँग्रेसचं आंदोलन, पालिकेच्या कार्यालया समोर बेमुद्दत आमरण उपोषण
Vasai-Virar News : वसई विरार महापालिका हद्दीतील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी काँग्रेसने आजपासून पालिकेच्या विरार येथील मुख्य कार्यालया समोर बेमुद्दत आमरण उपोषण सुरू केलं आहे. काँग्रेस च्या पर्यावरण विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष समीर वर्तक यांनी हे उपोषण सुरू केले आहे. काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. वसईतील 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना तात्काळ सुरू करा, वसईच्या दिवणमान येथील सर्व्हे नंबर 176 मधील प्रलंबित सर्वधर्मीय स्मशान भूमीचे काम सुरू करा, भूमाफियांच्या अनधिकृत मातीभराव मुळे बुडणाऱ्या वसईला वाचविण्यासाठी 12 कोटी रुपये खर्च करून, आय.आय.टी.आणि निरी च्या अहवालातील धरण तलावाच्या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा मागण्या उपोषणकर्त्यांनी केल्या आहेत.
Bhokar BJP Entry : भोकर तालुक्यातील 60 गावच्या सरपंचाचा भाजपात प्रवेश
भोकर तालुक्यातील 60 गावच्या सरपंचाचा भाजपात प्रवेश
अशोक चव्हाण यांच्या उपस्थित सरपंच संघटना भाजपात
नांदेड भाजपात इन्कमिंग, काँग्रेसमध्ये आउटगोइंग सुरूच
खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थिती रोजच पक्षप्रवेश सोहळे























