Maharashtra News LIVE : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Mumbai Mahim Accident News : मुंबई : मुंबईतील (Mumbai News) माहीमच्या समुद्रकिनारी (Mahim Chowpatty) बुडालेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह हाती लागला आहे. काल (सोमवारी) संध्याकाळी धुळवड (Holi 2024) साजरी करण्यासाठी गेलेले पाच जण समुद्राला भरती आल्यानं पाण्यात बुडाले होते. यावेळी लाईफ गार्डनी 4 तरुणांना वाचवत हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) दाखल केलं होतं. त्यातील एकाचा उपचारा दरम्यान काल मृत्यू झाला. तर पाचव्या बेपत्ता तरुणाचा काल संध्याकाळपासून शोध सुरु होता. मात्र, रात्री समुद्रात भरती असल्यामुळे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं, त्यानंतर आज सकाळी सर्च ऑपरेश दरम्यान, त्याचाही मृतदेह हाती लागला आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोनवर पोहोचली आहे. दोघांचेही मृतदेह सापडले आहेत. तर तीनजण सुखरुप बचावले आहेत.
Maharashtra Politics : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे रत्नागिरी, सिंधुदुर्ग दौऱ्यावर
Maharashtra Politics : एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे करणार रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा
Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ, छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू
Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्वीस्ट आला आहे. अजित पवारांनी बोलावली नाशिक लोकसभा मतदारसंघातील नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक, उद्या दुपारी 1 वाजता पुण्यात होणार अजित पवार गटाची बैठक, नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह नाशिक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी बैठकीला राहणार उपस्थित.























