Maharashtra News LIVE Updates 25th March : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
![Maharashtra News LIVE Updates 25th March : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... Maharashtra News LIVE Updates 25th March : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/25/8a855589716bbdccbdb8c983e49e0ae41711337184548322_original.jpeg)
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Dombivli Holi Celebration : खासदार श्रीकांत शिंदे यांनी साजरी केली धुळवड
Dombivli News : धुळवडनिमित्त आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली शिवसेना शहर शाखेला भेट दिली. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासोबत धुळवड साजरी केली. खासदार शिंदे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह नागरिकांना धुळवडच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी देशात चारशे पार तर महाराष्ट्रात 45 पार या दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे जात आहोत. येत्या निवडणुकीत कोणाला मत द्यायचं आहे, हे लोकांनी ठरवलं आहे. महायुतीचे खासदार पुन्हा निवडून येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व करतील असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना कल्याणमधील झालेल्या विकास कामांमुळे लोकं समाधानी आहेत. कल्याण बदलतेय कात टाकतेय, मला 2014 मध्ये अडीच लाखांच्या मताधिक्य होतं, 2019 मध्ये साडेतीन लाखांचं मताधिक्य होतं, यंदा विक्रमी मताधिक्याने लोक निवडून देणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. पुढे बोलताना आज वेगवेगळ्या रंगात जरी रंगलेले असलो तरी आमच्या सगळ्यांचा रंग आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा जो रंग आहे तो भगवा रंग आहे हिंदुत्वाचा रंग आहे बाळासाहेब ठाकरे यांचा रंग आहे आणि त्या भगव्या रंगाला आम्ही पुढे घेऊन जाण्याचे काम करतोय असे सांगितले.
Narayan Rane : नारायण राणेंनी घेतलं तुळजाभवानी मातेचे दर्शन
Tuljapue News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले, देशात मोदीजी यांनी 400 पेक्षा जास्त जागा मिळविण्याचा संकल्प केला असुन त्याला आम्ही साथ देऊन प्रत्येक उमेदवार जिंकून येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नारायण राणे यांनी तुळजापूर येथे सांगितले.
Nandurdar News : काँग्रेसचे युवा उमेदवार गोवाल पाडवी यांनी आदिवासी बांधवांसोबत साजरा केली होळी
नंदुरबार : लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी आदिवासींच्या पारंपारिक सण असलेल्या होळी सणानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील तीनशे वर्षांपासून साजरा होणाऱ्या होळी उत्सवात सहभाग घेतला असून त्यांनी आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली गुगल पाडवी यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत काठी संस्थांच्या होळी उत्सवात सहभाग नोंदवला यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री के सी पाडवी हे देखील उपस्थित होते.
Rahul Shewale : यंदाची धुळवड हिंदुत्वाच्या भगव्या रंगाची, विकसित भारताची ही होळी - राहुल शेवाळे
Dadar Holi : दादरला वैभवशाली परंपरा आहे. सास्कृतिक वसा आहे. तो जपत ही होळी आपण साजरी करतोय. यंदाची धुळवड ही वेगळी आहे, हिंदुत्वाच्या भगव्या रंगाची ही होळी आहे. विकसित भारताची ही होळी आहे. पंतप्रधानांनी पाहिलेल्या सर्व स्वप्नाच्या पूर्ततेची ही होळी. शिवसेनाही भगव्या हिंदुत्वाची होळी आपण साजरी करतोय. काही जणांची त्यांची वैयक्तिक महत्त्वमक्षा असते. ती त्यानी व्यक्त केलीय. पण आता शिवसेना म्हणून नाही तर आपण महायुती म्हणून लढतोय ते पाळायला हवं. अब की बार शिवसेना के साथ 400 पार हा नारा आम्ही देतोय. त्यामुळे वैयक्तिक महत्त्वकांक्षा व्यक्त करण्यापेक्षा महायुक्ती म्हणून काम करावं. वरिष्ठ पातळीवर चर्चा होतेय दोन दिवसातच जागावाटप जाहीर होईल, असं राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. ते दादरमधील होळी कार्यक्रमात उपस्थित होते.
Holi Celebration in Dadar : दादरमध्ये धुळवळीचं सेलिब्रेशन
Rang Barse Holi Celebration : दादरमध्ये पार्क क्लब जवळ सी बजकडून धुळवळीचं सेलिब्रेशन आयोजित करण्यात आलंय. त्या सेलिब्रेशनमध्ये सेलिब्रिटीसोबत मोठ्या संख्येने तरुणाई धुळवड सेलिब्रेशन साठी सहभागी झाली होती. एकीकडे रंगांची उधळण तर दुसरीकडे ढोल ताशा त्यासोबतच म्युझिक आणि रेन डान्स यामध्ये तरुणाईचा उत्साह आजच्या दिवशी दादर भागात पाहायला मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)