एक्स्प्लोर

Maharashtra News LIVE Updates : अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्याच तिकिटावर, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News LIVE Updates : अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्याच तिकिटावर, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

13:30 PM (IST)  •  23 Mar 2024

Dhule News : होळी, धूलिवंदनाची तयारी; धुळ्यात डोलची क्रेझ..

Dhule News : हिंदू संस्कृतीत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या सणांपैकी एक होलिकोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. होळीसाठी लागणार्‍या विविध साहित्याने बाजारपेठ सजू लागली आहे. डोलचीसह लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या पिचकार्‍या आणि रंग बाजारपेठेत दाखल झाले आहेत. मुखवटेही विक्रीसाठी आले आहेत.

धुळे जिल्हा हा त्याच्या अनोख्या पद्धतीने होळी खेळण्यासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. होळी खेळण्यासाठी वापरण्यात येणारी डोलची हा चर्चेचा विषय असतो. डोलची म्हणजे पत्र्यापासून तयार केलेलं भांडं असतं. होळी खेळताना यात पाणी भरुन एकमेकांच्या पाठीवर वार करतात. पाण्याचा सपासप वार उघड्या शरीरावर बसल्याने अंगाची लाहीलाही होते. परंतु, खेळणाऱ्यांचा उत्साह मात्र कमी होत नाही, उलट दुप्पट उत्साहाने ते एकमेकांवर डोलचीमध्ये पाणी उडवतात. धुळे जिल्ह्यातील होळी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असून होळीला डोलचीचा वापर करुन पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात. पत्र्यापासून तयार करण्यात आलेली ही डोलची तयार करण्याचं काम सध्या कारागिरांकडून मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा या डोलचीला असून इतर जिल्ह्यातून देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पत्र्याचे भाव वाढल्याने डोलची तयार करणं परवडत नसल्याची प्रतिक्रिया कारागिरांनी व्यक्त केली आहे

12:46 PM (IST)  •  23 Mar 2024

राजकीय नेत्यांनी जातीच्या मुद्द्यावर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे : पंकजा मुंडे

पंकजा मुंडे दोन दिवसापासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी सकाळीच नारायणगड येथे जाऊन नगर नारायणाचे दर्शन घेतलं यावेळी प्रीतम मुंडे देखील त्यांच्यासोबत होत्या.. राजकीय नेत्यांकडून सध्या विकासकेंद्रीत राजकारणाची अपेक्षा आहे गेल्या काही दिवसापासून विकासाचे मुद्दे नाही तर जातीय मुद्द्यावर जास्त चर्चा होत आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.. राजकारणामध्ये सोशल इंजिनिअरिंग महत्त्वाचं असतं आणि याच सोशल इंजिनिअरिंगचा आशीर्वाद मला मुंडे साहेबांनी दिला आहे निवडणुकीमध्ये आम्ही फक्त गप्पा मारणार नाहीत तर विकास करून दाखव असं म्हणत एकाच वेळी रेल्वेसाठी 4 हजार 800  कोटी रुपये मिळवून दिले तर नितीन गडकरी यांनी देखील बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवे तयार केले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामाची गती प्रचंड वाढलेली आहे असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत तर प्रीतम मुंडे ने देखील आता पंकजा मुंडे यांच्या विजयाची जबाबदारी घेतली असून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढल्याचे प्रीतम मुंडे म्हणाल्या आहेत

12:08 PM (IST)  •  23 Mar 2024

इंदापूरमध्ये आज महाविकास आघाडीचा मेळावा, शरद पवारांसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती

बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा आज इंदापूर शहरांमध्ये बाजार समितीच्या आवारात भव्य मेळावा होत असून या मेळाव्याला शरद पवार, मतदार संघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, याबरोबर आप आणि इतर घटक पक्षाचे देखील सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली असून शरद पवार इंदापूरकरांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. रोहित पवार, शर्मिला पवार, राजेंद्र पवार, सक्षणा सलगर देखील यावेळी उपस्थित आहेत. 

11:16 AM (IST)  •  23 Mar 2024

Amravati Lok Sabha Election : अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्याच तिकिटावर, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

अमरावतीचा उमेदवार हा भाजपच्याच तिकिटावर निवडणूक लढवेल असं मोठं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. तसेच राज्यातील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज सुटणार असून त्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

10:13 AM (IST)  •  23 Mar 2024

भाजप केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीत बोलावल्याची सूत्रांची माहिती, चंद्रशेखर बावनकुळेही दिल्लीला जाणार

भाजप केंद्रीय निवड समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये बोलावलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोबतच चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget