सिमेंट काँक्रिटच्या कामामुळे डहाणू चारोटी नाशिक रोडवर मोठी वाहतूक कोंडी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : सांगलीत महाविकास आघाडीची डोकेदुखी कायम आहे. सांगलीत विशाल पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवलीय. सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना यांची रस्सीखेच होती. मात्र काँग्रेसने शिवसेनेसमोर नमतं घेतल्यावर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. मात्र ते अर्ज मागे घेतील असं मविआचे नेते सांगत होते. पण तसं काहीही घडलं नाही. सोमवारी दुपारी ३ वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. त्यामुळे सांगलीत आता तिरंगी लढत होणार आहे.
Palghar Traffic: सिमेंट काँक्रिटच्या कामामुळे डहाणू चारोटी नाशिक रोडवर मोठी वाहतूक कोंडी
Palghar Traffic: सिमेंट काँक्रिटच्या कामामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आणि डहाणू चारोटी नाशिक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. याचा फटका वाहन चालक आणि प्रवाशांना बसत आहे. महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.
दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस, जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दाखल
Kolhapur Yatra : दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जोतिबाच्या दर्शनाला लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. केवळ महाराष्ट्रातून नाही तर दक्षिण भारतातून भाविक जोतिबा डोंगरावर आले आहेत. यंदा पाऊसमान चांगला व्हावा, रोगराई येऊ नये असं साकडं भाविकांनी घातलं. सुमारे सात ते आठ लाख भाविक आतापर्यंत जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. मानाच्या सासनकाठीचे पूजन झाल्यानंतर संध्याकाळी पालखी सोहळा पार पाडतो. या पालखी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी भाविकांची धडपड सुरू असते.
Pune Mumbai Block: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
Pune Mumbai Block: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. हलक्या आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद असणार आहे.
Devendra Fadnavis : नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर
Devendra Fadnavis : नवनीत राणांच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर आहेत. मेळघाटातील धारणीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.
Khed Shivapur Toll: खेडशिवापूर टोलनाक्याजवळ एक दारूने भरलेला टँकर उलटला
Khed Shivapur Toll: खेड शिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर उलटला आहे. चार क्रेनच्या सहाय्याने या टँकरला बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातामुळे खेडशिवापूर टोलनाक्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.