Maharashtra News LIVE Updates 19th March : नागपुरात पावसाची हजेरी, उन्हाच्या झळांपासून दिलासा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Yavatmal News : पालकमंत्री संजय राठोड यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी आणि गारपीटीमुळे आर्णी तालुकयातील लोणी परिसरातील आणि दारव्हा तालुक्यातील तसेच परिसरात शेतमालाचे मोठे नुकसान झाले. दारव्हा तालुक्यातील बिजोरा आणि आर्णी तालुक्यातील लोणी येथे पालकमंत्री संजय राठोड यांनी नुकसानग्रस्त पाहणी करत गहू, मका, पपई, टरबूज, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तींमुळे हिरावला असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले आहे. वीज पडल्यामुळे लोही येथील बाळू लक्ष्मण फुंड यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या घरी मंत्री संजय राठोड यांनी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Unseasonal Rain : पवनार शिवारात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट
Wardha Rain : वर्ध्याच्या पवनार येथे वादळी वाऱ्यासह गारपीट झाले आहे. अनेक घरावरील टिनपत्रे उडाली.तर उभी झाडे सुद्धा कोसळली आहेय. अजूनही बऱ्याच शेतकऱ्याचा गहू चणा निघावयाचा आहे.त्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे येथे केळीच्या बागेचे सुद्धा नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या या वादळ गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे.
Parbbhani Maratha Protest :
परभणी : सरकारने एक तर मराठा समाजाची फसवणुक केली सगे सोयरेंची अंमलबजावणी केली नाही, त्यातच आता पोलिसांच्या माध्यमातून मराठा समाजाची दडपशाही केली जात आहे. 24 फेब्रुवारीला परभणी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत रास्ता रोको आंदोलन केले गेले, मात्र पोलिसांनी तब्बल 750 जनावर गुन्हे दाखल केले. नुसते गुन्हेच नाही, तर जे कलम लावायला हवे, ते न लावता दुसरेच कलमं लावल्याने आज सर्वांना जामीन करून घेण्याची वेळ आलीय. मात्र आम्ही ही दडपशाही खपवून घेणार नाही, असा इशारा परभणीत सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय. परभणी शहरातील मराठा समाज मदत कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या पत्रकार परिषदेत सुभाष जावळे यांनी मनोज जरांगे यांनी 24 तारखेला बोलावलेल्या बैठकीसाठी परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून दोन कार्यकर्ते जाणार तसेच गावपातळीवर प्रत्येक घरावर आम्ही लोकप्रतिनिधी अन् त्यांच्या कार्यकर्त्यांना यायचे नाही, अशा प्रकारचे पोस्टर ही वितरित करत असल्याचे सांगितले.
Gondia Rain : गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस...हवामान विभागाने दिला होता ऑरेंज अलर्ट..
गोंदिया : हवामान विभागाने विदर्भात तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यात वर्तविली होती. त्यामुळे आज दुपारपासून गोंदिया जिल्ह्यात वादळी वारा सुरू होता. अखेर सायंकाळच्या सुमारास सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस बरसला आहे. या पावसाचा फटका गहू पिकांसह भाजीपाला पिकांना देखील बसणार आहे.
Nagpur Rain : नागपुरात पावसाची हजेरी
Nagpur Rain : नागपुरात गेले 20 मिनिटं जोरदार पाऊस पडतोय. सकाळपासून नागपुरात ढगाळ वातावरण होते. चार वाजताच्या सुमारास थंडगार वारे वाहायला सुरुवात झाली आणि त्यानंतर गेले 20 मिनिटं दमदार पाऊस होतोय, गेल्या तीन दिवसात नागपुरात रोज कमी अधिक प्रमाणात पाऊस पडतो आहे.