Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा फक्त एका क्लिकवर..
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Waris Pathan : वारीस पठाण यांना दहिसर चेक नाक्यावर अडविण्यात आलं, तीव्र शब्दात नाराजी
Waris Pathan : मिरा भाईंदर शहरात आज दुपारी एम आय एम चे नेते वारीस पठाण येणार असल्याने त्यांना शहरात न येऊ देता दहिसर चेक नका येथे अडवण्यात आलं. त्यांना मिरा भाईंदर हद्दीत प्रवेश न दिल्याने त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून आपला विरोध केला. वारीस पठाण याना अखेर दहिसर चेक नाका येथून त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस बंदोबस्तात दहिसर पोलीस ठाणे येथे घेवून जाण्यात आले आहे. वारीस पठाण यांनी यावेळी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तल्याच्या मार्फत यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Amravati : अमरावतीच्या पंचवटी चौकात एका तरुणाने स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेतलं..
Amravati : अमरावतीच्या पंचवटी चौकात एका तरुणाने स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेतलं.
नागरिकांच्या सतर्कतेने या तरुणाचे प्राण वाचले असून सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे..
युवक 60 टक्के जळल्याची डॉक्टरांची माहिती..
प्रविण देशमुख, (वय 35) लक्ष्मी नगर अमरावती अस जाळून घेतलेल्या तरुणाचं नाव असल्याची प्राथमिक माहिती...
तरुणावर सध्या अमरावती जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलिस करत आहे...
स्वतःला युवकाने का जाळून घेतल याच कारण अद्याप कळू शकल नाही...
Pune : पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न.
Pune : पुण्यात पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न..
महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न..
मात्र महिला घरात पळून गेल्याने घटना टळली..
पार्किंगच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडला..
दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने हा संपूर्ण प्रकार केलाय..
चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खराडी परिसरात घडली घटना..
चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल..
Pune : पुण्यात PMPL च्या बस खरेदी विरोधात मनसे आक्रमक
Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच PMPL 12 मीटर लांबीच्या 400 CNG बसेस खरेदी करणार आहे त्यासाठी PMPL ने निविदा देखील प्रसिद्ध केली आहे मात्र या बस खरेदीला मनसेने आक्षेप घेतला आहे. CNG बस खरेदीमुळे 350 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप देखील मनसेकडून करण्यात आला आहे .CNG ऐवजी इलेक्ट्रिक बस खरेदी कराव्यात अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.या बस खरेदी विरोधात ही खरेदी रद्द करण्यात यावी यासाठी मनसेकडून पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आणि CAG कडे तक्रार देखील दाखल केली आहे.
Nashik : नाशिक खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात, गाडीला मोठे नुकसान
Nashik : नाशिक खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा अपघात.
राजधानी दिल्लीतील बी डी मार्गावर झाला अपघात
हेमंत गोडसे वाचले.
गाडीला मोठे नुकसान..