Maharashtra Live Update: राज्यातील तसेच देशातील बातम्यांचा वेगवान आढावा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ करणार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार
Chhagan Bhujbal: छगन भुजबळ सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार करणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसोबत जाहीर सभांना देखील भुजबळ हजेरी लावणार आहे. नाशिकचा तिढा कायम असताना भुजबळ प्रचार सभा गाजवणार आहे.
ST Bus: उन्हाळी सुट्टीसाठी प्रवाशांची एसटीला पसंती
ST Bus: उन्हाळी सुट्टीसाठी प्रवाशांची एसटीला पसंती, मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांतून सरासरी ५० हजार प्रवाशांचा एसटीतून प्रवास, ज्येष्ठांना मोफत आणि महिलांसाठी ५० टक्के सवलत मिळाल्यामुळं प्रवाशांची संख्या वाढली.
Nagpur News: निवडणूक प्रचाराचे अखेरचे दोन दिवस मुख्यमंत्री नागपुरात
Nagpur News: निवडणूक प्रचाराचे अखेरचे दोन दिवस मुख्यमंत्री नागपुरात राहणार आहे. 16 आणि 17 एप्रिल हे दोन दिवस मुख्यमंत्री नागपुरात तळ ठोकणार आहे. नरखेड आणि सावनेर येथे मुख्यमंत्री शिंदेंच्या आज दोन सभा आहेत. रामटेक मधील शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नरखेड आणि सावनेर येथे आज मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा ही होणार आहे..
Vinayak Raut: रत्नागिरी-सिंधुदुर्गातून आज विनायक राऊत अर्ज दाखल करणार
Vinayak Raut: रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतादरसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत... यावेळी वैभव नाईक, राजन साळवी यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. ठाकरे गटाकडून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार आहे... रत्नागिरी-सिंधुदुर्गात महायुतीकडून नारायण राणेंच्या नावाची चर्चा आहे मात्र अद्याप अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही.
Solapur Lok Sabha:राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज अर्ज भरणार
Solapur Lok Sabha: भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपला अर्ज भरणार आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रोड शो करत शक्तिप्रदर्शन केलं जाईल.सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौक इथे देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होईल. तिथून सात रस्ता चौकपर्यंत रोड शो होणार आहे. त्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आई-वडिलांच्या प्रतिमेचं पूजन केलं.. तसंच सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊनही दर्शन घेतलं