Maharashtra Live Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भ, मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Sangali : सांगलीमध्ये पूर्ववैमनस्यातून खून, संशयित हल्लेखोरांच्या घरावर जमावाचा हल्ला;
Sangali : सांगलीमध्ये पूर्ववैमनस्यातून खून झालेल्या मधील संशयित हल्लेखोरांच्या घरावर जमावाचा हल्ला; घराचे नुकसान
काल रात्री राहुल साळुंखे या युवकाचा झाला होता सांगली मधील गणपती मंदिरासमोर खुन
खुनाच्या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी संशयित हल्लेखोरांच्या घरावर दगडफेक करीत तोडफोड केली
साळुंखे यांच्या खुनातील संशयित हल्लेखोरांच्या घरावर हल्ला चढविला
घटनेची माहिती समजताच शहर पोलिस घटनास्थळी धाव घेतली
या घटनेत संशयितांच्या घरांचे मोठे नुकसान झाले
Sanjay Shirsath : संजय राऊत आंतरराष्ट्रीय माणूस - संजय शिरसाठ, प्रवक्ते, शिवसेना
Sanjay Shirsath : संजय राऊत आंतरराष्ट्रीय माणूस - संजय शिरसाठ, प्रवक्ते, शिवसेना
भारताच्या पंतप्रधानांची तुलना पुतीन बरोबर केलीय
राऊत हे सद्दाम हुसैनसोबत बसतील, कधी पुतीनबरोबर जातील
निवडणुका येतील आणि जातील
एकीकडे जपानमध्ये राहुल गांधी लेक्चर देतात तशी हा महाराष्ट्रात लेक्चर देतो
मोदींचा अशाप्रकारे अपमान करणं चुकीचं
संजय राऊत वायफळ बडबड करतात
Bajrang Sonawane : माझ्यामुळे तीन वेळा जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली, धनंजय मुंडे यांच्या आरोपाला बजरंग सोनवणे यांचे उत्तर
Bajrang Sonawane : माझ्यामुळे तीन वेळा जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली..
धनंजय मुंडे यांच्या आरोपाला बजरंग सोनवणे यांचे उत्तर..
जिल्हा परिषद निवडून आणण येड्या गबाळ्याचे काम नाही
बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना बीडच्या लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
आणि बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर टीका करत आम्ही त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केलं
लोकसभेचे देखील तिकीट मिळवून दिलं होतं मात्र सोनवणे यांनी ऐन वेळेला धोका दिला अशी टीका केली होती
आणि याच टीकेला बजरंग सोनवणे यांनी देखील थेट उत्तर देत तीन वेळा माझ्यामुळेच जिल्हा परिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली
त्यामुळे धनंजय मुंडे यांनी यावर बोलू नये जिल्हा परिषद निवडून आणणं हे येड्या गाभाऱ्याचं काम नाही असे देखील बजरंग सोनवणे म्हणाले आहेत
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्रात एकही खासदार निवडून येणार नसल्याचा दावा
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्रात एकही खासदार निवडून येणार नसल्याचा दावा केला आहे.
कणकवलीत ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलले.
बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला.
राष्ट्रवादीची ताकद नाही, शिवसेना संपली, काँगेससाठी राहुल गांधी वणवण भटकत आहे.
मोदी बोलतात ते करून दाखवतात, भारत महासत्ता बनण्याचा संकल्प केलाय.
Prakash Mahajan : ट्रोलिंग विरोधकच करतात बाकी कोण करणार.. प्रकाश महाजन यांची राज ठाकरेंवरील सोशल मीडिया ट्रोलिंगवर भूमिका
Prakash Mahajan : प्रकाश महाजन यांची राज ठाकरेंवर भूमिका, सोशल मीडिया ट्रोलिंग, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
विरोधकांची टीका आणि सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग वर मनसेचे म्हणणे काय? पत्रकारांचा सवाल
महाजन म्हणाले, राज ठाकरे यांनी भूमिका खूप विचार करून घेतली आहे, काही कार्यकर्त्यांना ती भूमिका समजून घ्यायला काही वेळ लागेल
ज्याप्रकारे राज ठाकरेंनी भूमिका घेतली त्यामुळे विरोधकांचा अपेक्षाभंग झाला आणि त्यांची ही कोलेकुई सुरू झाली
ट्रोलिंग विरोधकच करतात बाकी कोण करणार, तुम्हाला माहिती आहे राज ठाकरेंचं महत्त्व काय आहे म्हणून ट्रोलिंग केलं जातंय