Maharashtra News Live Updates: उद्धव ठाकरे दोन दिवसीय रायगड दौऱ्यासाठी रवाना
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Uddhav Thackeay : उद्धव ठाकरे दोन दिवसीय रायगड दौऱ्यासाठी रवाना
Uddhav Thackeay : उद्धव ठाकरे दोन दिवसीय रायगड दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. आज आणि उद्या उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर असणार आहेत. एकूण पाच ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहे. पेणपासून या संपूर्ण कोकण दौऱ्याला सुरवात होईल. या दौऱ्यात आमदार , नेते उध्दव ठाकरे यांच्याबरोबर असणार आहे.
Akkalkot: हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक
Akkalkot: आज हिंदुत्ववादी संघटनांकडून अक्कलकोट शहर बंदची हाक दिली आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा संघटनांचा आरोप केला आहे. हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी बंदची हाक दिली आहे.
Rohit Pawar: रोहित पवारांवरील ईडी कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक
Rohit Pawar: आमदार रोहित पवार यांच्यावर सुरू असलेल्या ईडी करावयाच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. शासनाला सुबुद्धी मिळावी यासाठी नामदेव पायरी येथे विठ्ठलाची आरती करण्यात आली . राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला . सरकार हमसे डरती है , इडी को आगे करती है , लोकशाहीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता
Manoj Jarange: पाच महिन्यानंतर मनोज जरांगे आज घरी परतणार
Manoj Jarange: पाच महिन्यानंतर मनोज जरांगे आज घरी परतणार आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाच महिने आंदोलन करत आहेत. तर सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात अध्यादेश काढल्यानंतर जरांगे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं.
Navi Mumbai Traffic: कोपरखैरणे ते ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी
Navi Mumbai Traffic: कोपरखैरणे ते ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. बेलापूरहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनांच्या रांगा लागल्या आहे. कोपरखैरणे ते ऐरोली दरम्यान वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे.