Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
MLA Disqualification Case : एकनाथ शिंदेंना नोटीस जारी, दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीये. दरम्यान या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून यावेळी सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे नोटीस जारी केली आहे. तसेच त्यांना दोन आठवड्यात म्हणणं सादर करण्याचेही निर्देश दिलेत. त्याचवेळी सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही, असा सवाल देखील केला. यावर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी त्यासाठी बराच वेळ जाईल असं म्हटलं.
Suraj Chavan : सूरज चव्हाण यांचा कोठडीतील मुक्काम वाढला, 25 जानेवारीपर्यंत तापसयंत्रणेच्याच ताब्यात ठेवण्याचे निर्देश
Suraj Chavan : आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या सूरच चव्हाण यांच्या कोठडीत वाढ करणण्यात आली आहे. त्यांना 25 जानेवारीपर्यंत तपासयंत्रणेच्याच ताब्यात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सूरज चव्हाण यांना ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. दरम्यान ईडीने केलेली अटक ही बेकायदेशीर असल्याचा दावा करत सूरज चव्हाण यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलीये.
उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता
उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर लंच ब्रेकनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
गुलाबराव पाटलांंनी लुटला लेझीम खेळण्याचा आनंद
अयोध्या येथे होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात ही भव्य शोभा यात्रा काढण्यात आली यावेळी श्रीराम भक्ताच्या सोबत मंत्री गुलाबराव पाटील यांनाही लेझीम खेळण्याचा मोह आवरता आला नाही.
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवरील सुनावणी 24 जानेवारीपर्यंत तहकूब
मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवरील सुनावणी 24 जानेवारीपर्यंत तहकूब. अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल केलीय