Maharashtra News Updates : सोलापुरात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत राडा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
महाराष्ट्रातील जनतेच्या वेदना समजून घ्यायच्या आहेत: राहुल गांधी
कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत धावणाऱ्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देशाला जोडणे हा आहे. सध्या देशात द्वेष पसरवला जात आहे. अशा स्थितीत भारत तोडण्याच्या विरोधात भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आली आहे. हा मोर्चा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. सोमवारी रात्री नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ही हाक दिली. या पदयात्रेत मी पुढील 14 दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार असून येथील जनतेचे दुःख समजून घेण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा काल महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली आहे. आज सकाळी 8.30 वाजता नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होणार आहे
आदित्य ठाकरे आज औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर
आदित्य ठाकरे आज औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. ते सकाळी 11 वाजता औरंगाबाद येथील पैठण येथे शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करतील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधतील. गद्दारांचं सरकार कोसळणारच आदित्य ठाकरे यांची अकोल्यात गर्जना..तर ज्यांनी स्वतःला विकलं नाही त्यांना भेटायला आलोय असं म्हणत आदित्य ठाकरेंकडून नितीन देशमुखांचं कौतुक
राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली .डोंबिवलीतही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सत्तारांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले. डोंबिवली मानपाडा रोड परिसरात अब्दुल सत्तार यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवत त्या पुतळ्याला महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारत आंदोलन केले या वेळी कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत यांचा पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पुतळा ताब्यात घेत पुढची कारवाई सुरू केली.
सील्टबेल्टची सक्ती 11 नोव्हेंबरपासून नको तर 31 डिसेंबरपासून करा ! टॅक्सी संघटनांची मागणी.
सील्टबेल्टची सक्ती 11 नोव्हेंबरपासून नको तर 31 डिसेंबरपासून करा ! टॅक्सी संघटनांची मागणी केली आहे. मुंबईत अनेक जुन्या टॅक्सी आहेत त्यात प्रवाश्यांना सीट बेल्ट नाहीत. बाहेर सीट बेल्ट पुरेसे उपलब्द होत नसल्याने सीटबेल्ट सक्तीची मुदतवाढ मागितली आहे,
Solapur : सोलापुरात आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत राडा
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्या सोलापुरातील आगमनापूर्वीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि उत्तर पंचायत समितीचे माजी सभापती पांडुरंग पवार यांच्यात वादावादी झाली. दोन्ही पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर गेल्याची माहिती आहे. कालच्या बैठकीत झालेल्या वादावादीचा जाब विचारत आज पुन्हा वादावादी झाली. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर हा वाद मिटला आहे.
Nashik : काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी धारदार कोयत्याने कापला केक
काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी धारदार कोयत्याने कापला केक,
कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात खोसकरांचे कृत्य,
दोन दिवसांपूर्वीची ही घटना असून केक कापतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल,
एकीकडे सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे- फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार वादात सापडले असतानाच दुसरीकडे आता काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकरही चर्चेत.
Ambarnath: अंबरनाथमध्ये एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटली
अंबरनाथमध्ये एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.
यवतमाळच्या शहर पोलीस ठाण्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात तक्रार दाखल
देशातील राजकारणात आपल्या स्वकर्तृत्वावर ठसा उमटवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वापरली. यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. क्रांती राऊत यांनी दिली. पुरोगामी महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यापासून स्त्रियांवर अन्याय वाढत चाललेले आहे. आता तर या सरकारमधील मंत्री महिला खासदारांवर सुद्धा शिवीगाळ करून अपमान करीत आहे. अब्दुल सत्तार हे विसरले आहे की, त्यांनी ही आईच्या पोटातून जन्म घेतला ती सुद्धा एक स्त्री होती. मग अब्दुल सत्तार आपल्या आईला सुद्धा शिव्या देणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. खासदार सुळे यांच्यावर झालेल्या शिवीगाळ बाबत आज शहर पोलीस स्टेशन येथे लेखी रिपोर्ट देण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर कलम 294 तसेच 509 अनुसार गुन्हा नोंद करण्याची मागणी केलेली आहे.
दौंडमधील कुरकुंभ एमआयडीसीतील शोगन कंपनीत स्फोट, तीन जण जखमी
Pune News Update : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीतील केमिकल रसायन बनवणाऱ्या शोगन या कंपनीत रिअॅक्टरचा अचानक स्फोट झाला. रिॲक्टरमध्ये पॅराडाईज क्लोराईड हे केमिकल होतं. या केमिकलचा स्फोट झाला आहे. यामध्ये तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दुपारी तीनच्या दरम्यान कुरकुंभ येथील शोगन या मच्छर प्रतिबंधक तसेच इतरही प्रकारचे रसायन बनवणाऱ्या कंपनीत अचानक आग लागली. तांत्रिक दोषामुळे रिऍक्टरचा स्फोट झाला असून त्यात कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. स्फोटानंतर धुराचे लोट सुरू होते. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.