Maharashtra News LIVE Updates : नागपुरातील संघ मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी, पोलिस कंट्रोल रूमला फोन
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज 2022 चा अखेरचा दिवस आहे. देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या आहेत. सोबतच मुंबईतील पर्यटन स्थळेही नटली आहेत. मुंबईत वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटन दाखल झालेत. त्यानिमित्तानं बेस्टकडून गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळी अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापुरुषांच्या सन्मानार्थ यात्रेचा समारोप होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दिवंगत विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसनमुक्ती अभियानाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे बीडमध्ये येणार आहेत. सकाळी व्यसनमुक्ती रॅलीचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होईल.
अकोल्यात 'महाबीज'ची वार्षिक आमसभा
आज 'महाबीज'ची वार्षिक आमसभा आहे. यात संचालक, लाभधारक शेतकरी उपस्थित राहतील. गेल्या वर्षभरात खरीपात महाबीज बियाण्यांचे वाढलेले भाव यावरून लाभधारक शेतकरी आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. महाबीजचे अध्यक्ष आणि राज्याच्या कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले या आमसभेला उपस्थित असणार आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत
आज 2022 चा अखेरचा दिवस आहे. देशभरात नव्या वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषाची जोरदार तयारी सुरू आहे. थर्टीफर्स्टच्या निमित्ताने पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला असते. गोव्यात दरवर्षी थर्टीफर्स्टचा माहौल असतो. यंदा देखील पर्यट गोव्यात पोहोचले आहेत. याबरोबरच मुंबईत न्यू इअर सिलिब्रेशनसाठी सर्वच हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, नाइट क्लबमध्ये कुठलेही निर्बंध नसल्याने मोठी गर्दी अगदी पहाटे पर्यंत पाहायला मिळणार आहे. यासाठी हॉटेल मालकांनी सुद्धा विशेष तयारी केलीय.
मुंबईत स्थळी अतिरिक्त गाड्या
नववर्षाच्या निमित्ताने मुंबईत ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या आहेत. सोबतच मुंबईतील पर्यटन स्थळेही नटली आहेत. मुंबईत वर्षाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात पर्यटन दाखल झालेत. त्यानिमित्तानं बेस्टकडून गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळी अतिरिक्त गाड्या सोडल्या जाणार आहेत.
पुण्यात पोलिसांकडून वाहनांची तपासणी
ड्रंक आणि ड्राईव्ह रोखण्यासाठी ब्रेथ अनालायझर द्वारा प्रत्येक वाहन चालकांची पोलिसांकडून तपासणी होणार आहे. कोरोना विषाणूचा धोका पाहता पुणे पोलिसांकडून युज अँड थ्रो पाईपचा होणार वापर. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सोबत वाहन जप्तीची येऊ शकते.
नव वर्षाच्या पूर्व संध्येला दोघांचा डोहात बुडून मृत्यू
नववर्षाची सुरुवात होत असताना नववर्षाच्या पूर्वसंध्येला अमरावती जिल्ह्यात दोन विद्यार्थी डोहात बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली. मोहित घोरे (वय 18) परतवाडा आणि कृष्ण कोठेकर (वय 19) नागपूर असे मृतकाचे नाव आहे
मतदान केंद्राच्या यादीवर दावे व हरकती नोंदवाव्यात
Teachers Constituency Nagpur : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक नागपूर जिल्ह्यामध्ये घेण्याकरीता प्रस्तावित मतदान केंद्राची यादी आज 31 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर महानगर पालिका कार्यालय, नागपूर जिल्हा परीषद कार्यालय तसेच नागपूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पालिका कार्यालय, पंचायत समिती कार्यालय व तहसिल कार्यालयामध्ये याठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या यादीवर ज्यांना दावे व हरकती सादर करावयाचे असतील त्यांनी आपले दावे व हरकती लेखी स्वरुपात मतदान केंद्राच्या यादी प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसाचे आत म्हणजेच दिनांक 7 जानेवारी, 2023 च्यापूर्वी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नागपूर यांचे कार्यालयामध्ये लेखी स्वरुपात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून बांधकाम साहित्याची जाळपोळ
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात नक्षल्यांचा हैदोस सुरुच असून शुक्रवार रात्री एटापल्ली तालुक्यातील गट्टा-गट्टागुडा मार्गावरील निर्माणाधीन पुलाच्या बांधकामावरील यंत्रसामुग्रीची जाळपोळ केली. यावेळी नक्षल्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. गुरुवारी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील गाव पाटलाची हत्या केली होती. ही घटना ताजी असताना काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांनी गट्टा-गट्टागुडा मार्गावरील पुलाच्या बांधकामावरील मिक्सर मशीनची जाळपोळ केली. शिवाय जेसीबी व अन्य काही वाहनांची तोडफोडही केली. दरम्यान घटनास्थळापासून गट्टा पोलिस ठाणे जवळच असल्याने पोलिस सतर्क झाले. ते घटनास्थळाकडे कूच करु लागताच नक्षल्यांनी पळ काढला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
गडचिरोली : रानटी हत्तींनी केली घरांची नासधूस
गडचिरोलीच्या कुरखेडा तालुक्यातील नवेझरी येथे शुक्रवारी सांयकाळी रानटी हत्तीचा कळपाने गावात शिरकाव करीत गावातील चार घराची तसेच घरातील अन्नधान्य व इतर वस्तूंची मोठी नासधूस केली. मागील काही दिवसापासून तालूक्यात मुक्कामाने असलेले हत्ती प्रचंड दहशत माजवत आहेत. नवेझरी येतील शंकर तोफा, बारीकराव कोडाप, मानिक तोफा,विजय तोफा यांच्या घरी हत्तीनी प्रवेश करुन राहत्या घरातील धान व वस्तूंचे प्रचंड नुकसान करीत घराचीही मोड तोड केल्याने शेतकरी व मजूरी करणाऱ्या व्यक्तीवर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती ओडावली आहे. नुकसान भरपाई वन विभागाने तात्काळ भरून द्यावी अशी मागणी होत आहे.
राज्यात आज 30 नव्या कोरोना रूग्णांची नोंद
राज्यात आज 30 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर आज 38 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,88,082 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.17 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकाही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.