Maharashtra News LIVE Updates : एसटी महामंडळाची 35 हजार रूपये वेतनाची जाहीरात खोटी, अहमदनगर महामंडळाची माहिती
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जिल्हा दौऱ्यावर आहेत. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
विधिमंडळ अधिवेशनाचा आज 9 वा दिवस
विधिमंडळ अधिवेशनाचा आज 9 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यावर चर्चा होणार आहे.
मुंबईत अशोक नायगावकर यांचा सत्कार
साहित्य आणि व्यक्ती या कार्यक्रमात अशोक नायगावकर यांचा सत्कार आणि पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाला श्रीनिवास पाटील, सुशीलकुमार शिंदे, आशिष शेलार, राज ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
सोलापुरात सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन
सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज होणार आहे. या कृषी प्रदर्शनामध्ये महत्त्वाचे आकर्षण म्हणजे दीड टन वजनाचा आणि एक कोटी किंमतीचा गजेंद्र नामक रेडा पाहायला मिळणार आहे. यामध्ये 200 पेक्षा अधिक कंपन्या सहभाग घेणार आहेत. तसेच शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.
अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयावर हॉकर्स युनियनच्या वतीने मोर्चा
अहमदनगर हॉकर्स युनियनचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक संजय झिंजे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आज सकाळी 11 वाजता अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हॉकर्स युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.
अमरावतीत राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्र कामगार मंडळातर्फे अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात आज राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होणार असून सकाळी 11 वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मागील 27 वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात असून राज्यभरातील 225 कलावंत या स्पर्धेसाठी आपली हजेरी लावणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल भंडारा जिल्हा दौऱ्यावर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी 12 वाजता भंडारा शहरातील बावने कुणबी सभागृहात आयोजित पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळाव्याला ते उपस्थित रहाणार आहेत.
अभिनेत्री तुनिषाच्या शर्मा नातेवाईकांचे जबाब नोंदवणार
पालघर- वालीव पोलिस अभिनेत्री तुनिषाची मावशी, मामा आणि दोन चालकांचे जबाब नोंदवणार आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हैदराबाद दौऱ्यावर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज हैदराबादमध्ये जी नारायणम्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, बीएम मलानी नर्सिंग कॉलेज आणि सुमन ज्युनियर कॉलेज ऑफ वुमन एफिशिएन्सी सोसायटीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधतील. शमशाबाद येथील श्रीरामनगरम येथे असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’लाही ती भेट देणार
Mumbai Pune Expressway: मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर अवजड वाहनांची गर्दी
मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर अमृतांजन पुलाजवळ रात्री 9 वाजता गाडी बंद पडल्याने वाहूतुक कोंडी झाली होती. आता ही गाडी हटवण्यात आली असली तरी सुमारे एक किलोमीटरपर्यंत अवजड वाहनांची गर्दी आहे.
एसटी महामंडळाची 35 हजार रूपये वितनाची जाहीरात खोटी, अमदनगर महामंडळाची माहिती
एसटी महामंडळाच्या अहमदनगर विभागाने 17 डिसेंबर रोजी विभागिय कार्यशाळेत शिकाऊ तांत्रिक उमेदवारांसाठी प्रसिद्ध केलेली जाहिरात नियमित भरती प्रक्रियेची जाहिरात नसून ती शिकाऊ उमेदवारी अधिनियम अंतर्गत दरवर्षी आस्थापनांनी शिकाऊ उमेदवारांची भरती करणे अनिवार्य आहे. त्यानुसार सध्या कार्यरत असणाऱ्या शिकाऊ उमेदवारांची मुदत 31 जानेवारी 2023 रोजी संपत असल्याने नवीन शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यासाठी काढलेली जाहिरात आहे. ही जाहिरात BTRI यांच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येत आहेत. परंतु, काही अनधिकृत समाज माध्यंमा वर ही जाहिरात नियमित भरती प्रक्रिया असून यात 35 हजार रुपये वेतन, संबंधित पदासाठी मिळणारं असल्याचे धातांत खोटे सांगण्यात आले आहे. समाज माध्यंमामध्ये दिसणारी जाहिरात ही एसटी महामंडळाकडून देण्यात आलेली नाही. तरी उमेदवारांनी या खोडसाळ जाहिरातीवर विश्वास ठेऊन अर्ज करु नये, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.
नाशिकच्या सुरगाणा परिसरात भूकंपाचे धक्के
नाशिकच्या सुरगाणा परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दुपारच्या सुमारास 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. सुदैवाने यात कुठलीही मोठी हानी झाली नाही. परंतु, अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या एका प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
मुंबई विमानतळावर परदेशातून आलेल्या एका प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबई विमानतळावर 28 डिसेंबर रोजी परदेशातून 97 फ्लाईट आल्या आहेत. ज्यामध्ये 16993 प्रवासी होते. केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट मुंबई विमानतळावर करण्यात आली. यामध्ये एकूण 377 प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यातील 350 प्रवाशांचे आरटीपीसीआर अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. हा प्रवासी नेमका कोणत्या देशातून आला? या संदर्भात मुंबई महापालिका आता विमानतळ प्रशासनाकडून माहिती घेत आहे.
मुकेश अंबानीच्या मुलाला पाहण्यासाठी मुंबई विमानतळावर गर्दी, आठ नंबर गेटवर वाहतूक कोंडी
उद्योगपती मुकेश आंबानी यांचे पूत्र अनंत याचे लग्न राधिका मर्चंटसोबत ठरले आहे. लग्न लग्न ठरल्यानंतर हे जोडपे मुंबई विमानतळ गेट नंबर आठमधून काही वेळामध्ये बाहेर येणार आहे. अनंत अंबानी यांना पाहण्यासाठी मुंबई विमानतळाच्या आठ नंबर गेट बाहेर नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. गर्दीमुळे मुंबई विमानतळ आठ नंबर गेट बाहेर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.