Maharashtra News Updates 29 October 2022 : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; आदित्य ठाकरे यांची मागणी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
किशोरी पेडणेकर यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी
कथित एसआरए घोटाळा प्रकरणी काल शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. आज सकाळी 11 वाजता पुन्हा त्यांना दादर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असून आज सकाळी 10.30 वाजता किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद होणार आहे
मुख्यमंत्री नंदूरबारच्या दौऱ्यावर
शिंदे गटाचा पहिला मेळावा आज नंदूरबार येथे होणार आहे. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे.
आज उस्मानाबाद बंदचे आवाहन
आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाचा काल पाचवा दिवस संपला. अजूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आज उस्मानाबाद बंदचे आवाहन करण्यात आलंय.
पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा
शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त औरंगाबादच्या पैठणमध्ये शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. यामध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या प्रमुख वक्त्या म्हणून भाषण करणार आहेत. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील उपस्थित असणार आहेत.
आशिष शेलार यांची पत्रकार परिषद
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद होणार आहे.
आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर
आमदार बच्चू कडू यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. दुपारी 12 वाजता बाभूळगाव येथून दौऱ्याला सुरुवात होईल. नुकसानीची पाहणी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
एअरबसचा प्रकल्प कुठेही महाराष्ट्रात येणार असे ठरले नव्हते - सामंत
आज मझ्यावकडे सर्व कागदपत्रे आहेत. एअरबसचा प्रकल्प कुठेही महाराष्ट्रात येणार असे ठरले नव्हते. तो प्रकल्प मिहान मध्ये येणार होता, एम आय डी सी सोबत कोणतेही बोलणे झाले नव्हते, ते मिहान सोबत झाले होते - सामंत
आदित्य ठाकरे आरोप करतात पण कागदपत्र देऊ शकले नाहीत - सामंत
आदित्य ठाकरे आरोप करतात पण कागदपत्र देऊ शकले नाहीत - सामंत
Palghar : बंद कारखान्यात भंगार चोरी करण्यासाठी गेला आणि झाला सिलेंडरचा स्फोट, एक जण गंभीर जखमी
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात केमिकल कंपनीत स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत पुन्हा एकदा ब्लास्ट झाला आहे. यावेळी कंपनी बंद असल्याने ही घटना कशी घडली याबद्दल तपास करण्यात येत असून. या तपासासून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रात औरा ऑइल या बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सिलेंडरचा ब्लास्ट होऊन भीषण आग लागली. बंद असलेल्या कंपनीत गॅस कटरच्या सहाय्याने कंपनीतील साहित्याची चोरी करत असताना हा ब्लास्ट झाला असल्याची माहिती समोर आली असून या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या जखमीवर बोईसर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटानंतर कंपनीला भीषण अशी आग लागली असून या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.

लिफ्टमध्ये अडकून 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू, मुंबईच्या गोराई चारकोप भागातील घटना
मुंबईतील गोराई चारकोपमधून एक धक्कादायक व लक्ष विचलित करणारी बातमी समोर आली आहे. रहिवासी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अडकून एक 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. नगीना अशोक मिश्रा असे मृत महिलेचे नाव आहे ही घटना गोराई चारकोप मधील हायलँड ब्रिज इमारतीत घडली आहे. या घटनेमुळे लिफ्ट मुळे होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.