एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 28 December 2022 : सत्तेचा दुरुपयोग कसा होतो याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण : शरद पवार  

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 28 December 2022 : सत्तेचा दुरुपयोग कसा होतो याचे अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण : शरद पवार  

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

अधिवेशनाचा आज 8 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची आज बैठक होणार आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज कारागृहातून बाहेर येणार आहेत. त्यानिमित्ताने अर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदीर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे. 

अधिवेशनाचा आज 8 वा दिवस
अधिवेशनाचा आज 8 वा दिवस आहे. विधिमंडळाच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीची आज बैठक होणार असून अधिवेशनाच्या कालावधीचा निर्णय होणं अपेक्षित आहे. आज विविध विषयांवर 11 मोर्चे निघणार आहेत.  काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
 
अनिल देशमुख आज कारागृहातून बाहेर येणार  

100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जामीनावरील स्थगिती उठवल्यानंतर आज ते  कारागृहातून बाहेर येणार आहेत. त्यानिमित्ताने अर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदीर दरम्यान बाईक रॅली काढण्यात येणार आहे. 

काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम

28 डिसेंबर 1885 साली मुंबईतील तेजपाल सभागृह येथे काँग्रेसची स्थापना झाली होती. आज त्या ऐतिहासिक घटनेला 138 वर्षे पूर्ण होत आहेत. 28 डिसेंबर काँग्रेस स्थापना दिवस दरवर्षी संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात 'प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जातो. आज काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा सत्कार होणार आहे. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे, श्री के सी वेणू गोपाल, एच के पाटील, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार, भाई जगताप, नाना पटोले, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, चरणसिंग सप्रा यांच्यासह आदी नेते उपस्थित रहाणार आहेत, दुपारी 3.30 वाजता, सोमय्या मैदान, सायन येथे हा कार्यक्रम होणार आहे. काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चहा पानाच्या कार्यक्रमास शरद पवार उपस्थित राहणार आहेत. 

शिवसेना आणि मनसेचे पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार 

शिंदें गटाचा दोन्ही ठाकरेंना दणका शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार, पदाधिकारी आज नागपूरमध्ये बाळासाहेबाच्या शिवसेनेत प्रवेश करत असताना मनसेचे पदाधिकारी ही शिंदे गटात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अमित ठाकरे नशिकमध्ये असताना मनसेचे दोन विभाग अध्यक्षचा पक्षाला जय महाराष्ट्र या आधी शहर समनव्याक ही शिंदे गटात सहभागी झाल्यानं आधीच कमजोर असणाऱ्या मनसेला आणखी एक धक्का बसलाय.  
 
संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन

आज संभाजी ब्रिगेडचे रौप्य महोत्सवी अधिवेशन आहे. सकाळी 10 वाजता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन तर संध्याकाळी 5.30 वाजता शरद पवार यांच्या हस्ते समारोप.  

 चंदा आणि दिपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कस्टडी आज संपणार
आयसीआयसीआय बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी चंदा आणि दिपक कोचर यांच्यासह व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांची सीबीआय कस्टडी आज संपतेय. या तिन्ही आरोपींना पुढील रिमांडसाठी मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. सीबीआय आरोपींची आणखीन कस्टडीत वाढवून मागण्याच्या तयारीत तर आरोपींच्यावतीनं न्यायालयीन कोठडीसाठी प्रयत्न होतील. रिपोर्टर - अमेय

तुनिषा शर्माचा प्रियकर शीझान खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार 

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकर शीझान खानला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्याला वालीव पोलिसांनी अटक केली असून तो चार दिवस पोलिस कोठडीत होता. 
 
खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची लटकती तलवार यावर सुनावणी  
महानगर दंडाधिकारी न्यायालय आज खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर अटकेची लटकती तलवार यावर सुनावणी होणार आहे. दोघांविरोधात जारी आजामीन पात्र वॉरंटवर कारवाई करण्याचा शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.  

23:45 PM (IST)  •  28 Dec 2022

औरंगाबादेत एका मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप अडकले

औरंगाबादेत एका मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप अडकले. एक-दोन नव्हे तर तब्बल 20 साप. माश्यांऐवजी साप पाहून मच्छीमाराची भंबेरी उडाली. यावेळी सर्पमित्र्याच्या मदतीने सापांची सुटका करण्यात आली.
ही घटना  विटावा शिवारातील तलावात घडली.   20 पैकी 14 सापांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले, तर 6 सापांचा मृत्यू झाला

23:41 PM (IST)  •  28 Dec 2022

भिवंडीत बोगस डॉक्टर पतिपत्नी विरोधात गुन्हा दाखल करून अटक कारवाई

भिवंडी या कामगार वस्तीच्या शहरात असंख्य झोपडपट्टी विभागांमधून बोगस डॉक्टर सर्रासपणे सर्वसामान्य नागरिकांवर औषध उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळ करीत आहेत.आणि असे असताना याबाबत अनेक तक्रारी महानगर पालिका आरोग्य विभागाकडे होत असतात. नुकताच अशाच एका तक्रारीनंतर भिवंडी शहरातील हमाल वाडा या परिसरात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोघा पती-पत्नीवर महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी यांनी गुन्हा दाखल केला आहे.मोमीन मुशर्रफ नूर मोहम्मद अशरफी वय 46 व रायला मुशर्रफ मोमीन वय 40 असे अटक कारवाई झालेल्या बोगस डॉक्टर पतीपत्नीचे नाव आहे .यांनी दिनांक 1 ते 10 ऑगष्ट 2022 दरम्यान या बोगस डॉक्टरांनी तनवीर गुलाम मुस्तफा मोमीन वय 52 यांच्या वर या बोगस डॉक्टरांनी दवाउपचार करीत वेगवेगळया वैद्यकीय तपासण्या करायला भाग पाडून चुकीचे पध्दतीने दवा उपचार केल्याने अटक केली आहे..

23:41 PM (IST)  •  28 Dec 2022

माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जमिनानंतर जल्लोषात स्वागत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हजार कोटी वसुली प्रकरणी आज रोजी जामीन मंजूर झाला असून त्यांची कारागृहातून सुटका झाली त्यानंतर त्यांनी माझ्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचे सांगत प्रथम सिद्धिविनायकाच्या दरबारी बाप्पाच्या दर्शनाला गेले व त्यानंतर त्याने चैत्यभूमीला हजेरी लावल्यानंतर त्यांचा ताफा त्यांच्या वरळी येथील निवासस्थानी पोहोचले त्या ठिकाणी जोरदार फटाक्यांचे आतिषबाजी तसेच ढोल ताशाचा गजरात कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा पाहायला मिळाल्या इमारतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जल्लोष पाहायला मिळाला दिवसभराच्या घडत असलेल्या घडामोडी कुटुंबीय एबीपी माझ्यावर पाहत होते यादरम्यान कुटुंबीयांशी संवाद साधला असता त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या तसेच अनिल देशमुख त्यांनी गेल्या 14 महिन्यांपासून आपल्या कुटुंबीयां पासून दूर होते आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांची तसेच आपल्या नातवंडांची भेट घेतली यावेळी त्यांची ओवाळणी करून घरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

 
 
23:12 PM (IST)  •  28 Dec 2022

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 122 व्या जयंतीचे औचित्य साधून वंदनीय लतादीदीवर रचलेल्या गीताच्या ध्वनीचित्रफितीचा प्रकाशन सोहळा

 

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 122 व्या जयंतीचे औचित्य साधून टाइम्स म्युझिक निर्मित, भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरबद्ध केलेल्या आणि डॉ. दीपक वझे यांनी वंदनीय लतादीदींवर रचलेल्या पहिल्याच गीताच्या ध्वनीचित्रफितीचा प्रकाशन सोहळा गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात रात्री ८ वाजता आयोजित केला आहे.  तुषार पानके यांनी याचे चित्रीकरण केले आहे.
त्यानिमित्ताने, विश्वस्वरमाऊली हा लतादीदींच्या लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.. केतकी माटेगावकर, सावनी रवींद्र, प्रियांका बर्वे आणि विभावरी आपटे जोशी ह्या कलाकारांचा सहभाग असलेल्या या कार्यक्रमाला अजय मदन यांचे संगीत संयोजन लाभले असून निवेदन स्मिता गवाणकर यांचे आहे तसेच, पं. हरिप्रसाद चौरसिया आणि उषा मंगेशकर यांची प्रमुख उपस्थितीत लाभली आहे. आर्यन इन्स्टिट्यूट ऑफ चेस अँड आर्ट एक्सलन्स यांची प्रस्तुती असलेल्या या सोहळ्याला एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी चे विशेष सहकार्य लाभले असून संयोजन हृदयेश आर्ट्सचे आहे.. या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका बुकमायशो वर उपलब्ध आहेत असे आयोजकांनी कळविले आहे...

22:28 PM (IST)  •  28 Dec 2022

दहावीतील विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून थेट मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

दहावीतील विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून थेट मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आयुष गारळे असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होते. आयुष अभ्यास करत नाही, म्हणून शाळेतून काढून टाकेन, दहावीच्या परीक्षेत हक्काचे 20 गुण देणार नाही, दहावीच्या परीक्षेला ही बसू देणार नाही. अशी धमकी मुख्याध्यापक हितेश शर्मा देत होते. असा त्यांच्यावर आरोप आहे. आयुष दिघी येथील प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेतो. त्याच शाळेत दहा डिसेंबरला ही आयुषला आणण्यासाठी आई स्वतः गेल्या होत्या. तेंव्हा ही मुख्याध्यापक शर्मा यांनी आईला आवाज देऊन बोलावून घेतलं आणि वरील सर्व बाबी त्यांच्या ही कानावर टाकल्या. त्यामुळं आयुष टेन्शनमध्ये होता. अशातच 13 डिसेंबरला घरातील सगळे बाहेर गेले, तेंव्हा एकटाच घरी असणाऱ्या आयुषने गळफास घेत आयुष्य संपवलं. या मृत्यूला मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. त्याच आधारावर भोसरी पोलिसांनी मुख्याध्यापक शर्मा यांच्यावर 24 डिसेंबरला कलम 305 नुसार गुन्हा दाखल केलाय.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget