Maharashtra News Updates : पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी , पुणे- दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू.
आज धनत्रयोदशी
दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी हा धन्वंतरी दिन म्हणून साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी पृथ्वीवर येण्यापूर्वी आयुर्वेद गुप्त अवस्थेत होता. त्यांनी आयुर्वेदाचे आठ भाग करून सर्व रोगांवर औषधोपचाराची पद्धत विकसित केली अशी अख्यायिका आहे. आयुर्वेदाचे संस्थापक आणि वैद्यकीय शास्त्राचे देवता भगवान धन्वंतरी हे आरोग्य, वय आणि तेज यांची देवता असल्याचं मानलं जातंय. आरोग्यदेव धन्वंतरी हे प्राचीन भारतातील एक महान चिकित्सक होते. दीपावलीच्या दोन दिवस अगोदर कार्तिक त्रयोदशी या दिवशी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी मानवी समाजाला दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी प्रार्थना केली जाते.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते 75 हजार बेरोजगारांना नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये रोजगार मेळ्याचा शुभारंभ होणार आहे. केंद्र सरकारनं 10 लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात आज देशातील 75 हजार बेरोजगारांना आज नोकरींचं नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. केंद्रीय सशस्त्र बल, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनो, आयकर निरीक्षक या विविध पदांसाठी यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे भरती बोर्डच्या माध्यमातून ही भरती केली जात आहे. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्तीपत्र दिलेल्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबईत पियुष गोयल, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार या रोजगार मेळा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. नागपुरातही रेल्वेच्या सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात 200 तरुणांना रेल्वे आणि केंद्र सरकारच्या इतर विभागात संदर्भात नियुक्तीपत्र दिले जाणार आहे.
आजपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू
तब्बल तीन वर्षानंतर आजपासून (22 ऑक्टोबर) नेरळ ते माथेरान अशी मिनी ट्रेनची (Neral-Matheran Mini Train) सेवा सुरू झाली. आज सकाळी पहिली ट्रेन नेरळ स्थानकातून सुटली. सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं प्रवासी (Passenger) उपस्थित होते. उपस्थित असणाऱ्या सर्वांसाठीच तो आनंदाचा क्षण होता. ही ट्रेन सकाळी 11.30 वाजता माथेरानला (Matheran) पोहोचणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी , पुणे- दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू
पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झालीय. त्यामुळे पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू झालाय.
आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही - शिंदे
आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्री पदाची हवा गेलेली नाही, हा एकनाथ शिंदे आजही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे -मुख्यमंत्री म्हणाले
दिघे साहेब नेहमी म्हणायचे एक तरी वेळेस ठाण्याचा मुख्यमंत्री होईल
दिघे साहेब नेहमी म्हणायचे एक तरी वेळेस ठाण्याचा मुख्यमंत्री होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न; दिपाली सय्यद यांचा आरोप
मी दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले. मी काम करत आहे. हे काम चालूच राहिल. मी दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ते शक्य झालं नाही. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते मात्र मला त्यांच्यापर्यंत भेटू दिलं जातं नव्हतं. जे चार जण मला भेटू देत नव्हते त्या चार जणांनी मी लवकरच त्यांची नावे सांगणार आहे, असा इशारा दिपाली सय्यद यांनी दिलाय.