एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 22 January 2023 : कुर्ल्यातील शिवाजी मंडईतील दुकानांना भीषण आग, फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 22 January 2023 : कुर्ल्यातील शिवाजी मंडईतील दुकानांना भीषण आग, फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

दिवसभरात काय काय होणार आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते... राजकीय, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रासह इतर क्षेत्रात दिवसभरात काय काय महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत, याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील एका कार्यक्रमात एकाच मंचावर असणार आहेत. दोघांच्या भाषणाकडे पुणेकरांचं लक्ष लागलेय. त्याशिवाय आज वर्षातील पहिलीच शनी अमावस्या आहे. तर मुंबईतील गोखले ब्रिजसाठी पश्चिम रोल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या घडामोडी घडणार आहेत.... 

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी आरोप केले आहेत. त्या आरोपांची आता चौकशी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत आज भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारणी बैठक होणार आहे. या बैठकीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह सहभागी होणार नाहीत.

अयोध्येत आज भारतीय कुस्ती महासंघाची बैठक

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी आरोप केल्यानंतर दिल्लीतील वातावरण तापल्याचं चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येत आज भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारणी बैठक होणार आहे. या बैठकीत कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह सहभागी होणार नाहीत.

नांदेडच्या सीमावर्ती भागात तेलंगणाच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची बैठक 

नांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, धर्माबाद या तेलंगणा सीमावर्ती भागात आज तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या पक्षांच्या आमदार, खासदारांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. तेलंगणा सीमावर्ती भागातील नागरिकांच्या समस्या आज भारत राष्ट्र समिती पक्षाचे आमदार, खासदारांसोबत सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहेत. दोन खासदार आणि तीन आमदार या बैठकीसाठी येणार आहेत.

पुण्यात आज हिंदू जनआक्रोश मोर्चा 

पुण्यात आज हिंदू जनआक्रोश मोर्चाचं सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात होईल आणि तो डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहचेल. या मोर्चात भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैय्या, धनंजय देसाई यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार, नगरसेवक असे सर्व नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. 

अमरावतीमध्ये शंकरपाट स्पर्धा 
 
बहिरम यात्रा आता चांगलीच रंगात आली आहे. या उत्साहात बहार आणण्यासाठी बहिरम परिसरात आमदार बच्चू कडू यांच्याकडून शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ते 23 जानेवारी दरम्यान हे शंकरपट होत असून यात मोठ्या रक्कमेची बक्षिसे ठेवण्यात आली असून तळेगाव दशासर शंकरपटात सहभागी झालेल्या बैलजोड्यासह राज्यभरातुन तसेच शेजारच्या मध्यप्रदेश राज्यामधूनही स्पर्धक दाखल झालेत.

अहमदनगरमध्ये हिंदू जनजागृती समितीची सभा

अहमदनगरमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सायंकाळी 5:00  वाजता हिंदू राष्ट्र-जागृती सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रोफेसर चौक येथील जॉगिंग पार्क येथे ही सभा होणार असून याला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव, सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके, हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट आणि रागेश्री देशपांडे या सभेत बोलणार आहेत.

23:05 PM (IST)  •  22 Jan 2023

Kurla Fire: कुर्ल्यातील शिवाजी मंडईतील दुकानांना भीषण आग, फायर ब्रिगेडच्या चार गाड्या घटनास्थळी

कुर्ल्यातील शिवाजी मंडई येथे दुकांनाना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या चार गाड्या पोहोचल्या असून ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 

11:16 AM (IST)  •  22 Jan 2023

Jitendra Awhad and Amol Mitkari : 3 फेब्रुवारीपासून जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांची महापुरुष सन्मान यात्रा

Jitendra Awhad and Amol Mitkari : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांची महापुरुष सन्मान जागर यात्रा 3 फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथून यात्रेला सुरुवात होणार आहे.  जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांच्या साथीला आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांची देखील साथ मिळणार आहे. हे तीन नेते मिळून राज्यभरात ठिकठिकाणी मेळावे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज यांच्या गाथा सांगणार आहेत. 

11:11 AM (IST)  •  22 Jan 2023

Pune News : पुण्यात सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात

Pune News : पुण्यात आज सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा धर्मवीर दिन म्हणून घोषित करावा, गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यसह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा लाल महालपासून निघणार असून डेक्कनच्या छत्रपती सभाजी पुतळ्यापर्यत काढला जाणार आहे. या मोर्चाला हिंदू जनआक्रोश मोर्चा अस नाव देण्यात आलं आहे. सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. या मोर्चात आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, 'तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई सह मोठा जनसमुदाय उपस्थितीत राहणार आहे. हा मोर्चा शहरातील मध्य भागातून म्हणजे शिवाजी रस्ता,लक्ष्मी रस्ता,अलका चौक डेक्कन चौक व शेवट छत्रपती सभाजी महाराज पुतळा असा जात असल्याने वाहतुक पोलिसांनी मोर्चा मुळे वाहतुकीत बदल केले आहेत.

11:01 AM (IST)  •  22 Jan 2023

Amravati Accident : अमरावतीत समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर तीन जण जखमी

Amravati Accident : वेगवान महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाची ओळख आहे. मात्र समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून यावर अपघातांची मालिका सुरू आहे. आज सकाळी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील हद्दीत कारचा अपघात झाला आहे. या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून 3 जण गंभीरित्या जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले आहे. हा अपघात गाडी डीवाईडरला धडकल्याने झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

10:09 AM (IST)  •  22 Jan 2023

Moreshwar Temurde passes away : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Adv. Moreshwar Temurde passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. अॅड टेमुर्डे यांनी 1991 ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात दोन वेळा वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केलं. 1991 ते 1995 या काळात विधानसभा उपाध्यक्ष होते. टेमुर्डे, जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीत मोठा वाटा होता. राजकारणात अत्यंत सक्रिय असलेले टेमुर्डे राजकीय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले 1 मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव वरोरा येथील राहत्या घरी ठेवण्यात आले आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
Embed widget