एक्स्प्लोर

Maharashtra News Updates 21 November 2022 : कामाख्या देवीच्या दर्शनाचा मुहूर्त ठरला, येत्या 26-27 नोव्हेंबरला शिंदे गट गुवाहाटीच्या दौऱ्यावर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates 21 November 2022 : कामाख्या देवीच्या दर्शनाचा मुहूर्त ठरला, येत्या 26-27 नोव्हेंबरला शिंदे गट गुवाहाटीच्या दौऱ्यावर

Background

Jitendra Awhad : सुधांशू त्रिवेदींनी शिवाजी महाराजांची 'ती' पाच पत्रे दाखवावी, जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) , यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्य यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापल्याचं दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्त सुधांशू त्रिवेदी(Sudhanshu Trivedi)  यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होतेय. यावर माजी मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे, 

सुधांशू त्रिवेदी काय म्हणाले?

एका खासगी वृत्तवाहिनीच्या डिबेट शोमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. त्रिवेदी यांच्या या विधानावर जोरदार टीका होतेय. ते म्हणाले, 'औरंगजेबला पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांनी 5 वेळा माफी मागितली', असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं. यामुळे संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

मोठे षडयंत्र, शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न : जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, यामध्ये मोठे षडयंत्र आहे. याच बदलातून आणि वर्णभेदातून हर हर महादेव नवीन चित्रपट आणला होता. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे कसे श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेले काही वर्षे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व विशिष्ट पद्धतीने वेगळे दाखवले आहे. या घटनेला कोणता ऐतिहासिक संदर्भ नाही. इतिहासात अनेक माणसाने शूर कार्य केले आहे, त्यांना योग्य पद्धतीने दाखवा."

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेचं मध्यप्रदेशात प्रस्थान, तरीही राहुल गांधी महाराष्ट्रातच; आज औरंगाबादमध्ये

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनं (Bharat Jodo Yatra) राज्यातून मध्य प्रदेशात प्रस्थान केलं.  राज्यातील यात्रेचा शेवटचा दिवस कालच पार पडला असला तरी राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात असणार आहेत. आज राहुल गांधी औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत.  'राहुल गांधी आज औरंगाबाद येथे येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुकुंदवाडी बसस्टॉप जवळ काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी 05:30 वाजता उपस्थित राहावे', असं आवाहन औरंगाबाद काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

असा असणार राहुल गांधींचा दौरा...

आज सोमवारी राहुल गांधी हे हेलिकॅप्टरने औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून खाजगी विमानाने गुजरातला जाणार आहेत. दरम्यान गुजरातमध्ये त्यांच्या सभा होणार आहे. तर गुजरात येथील सभा आटोपून विमानाने राहुल हे पुन्हा औरंगाबाद विमानतळावर परततील. पुढे औरंगाबाद विमानतळावरून खाजगी वाहनाने कमळनुरीला जाणार आहेत. यावेळी रस्त्यात औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याबाबत औरंगाबाद काँग्रेसकडून माहिती देण्यात आली आहे.

14 दिवसांपूर्वी नांदेडमध्ये धडकलेली यात्रा काल जळगाव जिल्ह्यातील जामोदमार्गे मध्यप्रदेशात पोहोचली. भारत जोडो यात्रेच्या या 14 दिवसांच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. राज्यातील भारत जोडो यात्रा राज्यातील पाच जिल्ह्यातून प्रवास करुन मध्य प्रदेशमध्ये पोहोचली. 

21:54 PM (IST)  •  21 Nov 2022

मुंबईतील गोवर आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या 208 वर 

मुंबईतील गोवर आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या २०८ वर, मुंबईतील एकूण गोवर आजाराच्या संशयित रुग्णांची संख्या ३ हजार २०८ वर 

आज मुंबईतील रुग्णालयातून २२ जणांना डिस्चार्ज तर नव्याने २३ रुग्ण उपचारासाठी दाखल 

गोवर उपचाराकरीता सेव्हन हिल्स रुग्णालयातही पुढील दोन दिवसात ५० बेड्स उपलब्ध होणार 

संशयित रुग्णांपैकी २४ जणांना गोवरची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त

मुंबईत गोवरमुळे आतापर्यंत एकूण ९ चिमुकल्यांचा मृत्यू 

९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांचे लसीकरण ताबडतोब करुन घेण्याचे महापालिकेचे आवाहन, पालिकेकडून सर्व वाॅर्डमध्ये अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन

21:52 PM (IST)  •  21 Nov 2022

आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी अखेर बंद

आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी अखेर बंद

एअर सुविधा फॉर्म भरण्याची आणि आरटीपीसीआर कोविड टेस्ट करण्याची अनिवार्यता केंद्र सरकारने बंद केली

कोरोना काळातून बाहेर येत असल्याचं आणखी एक निदर्शक, काही दिवसांपूर्वी फ्लाईट मधली मास सक्तीही सरकाने रद्द केली होती

21:48 PM (IST)  •  21 Nov 2022

महाजेनकोकडून सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या 590 पदाची रिक्त पदांच्या सरळ सेवा प्रवेशद्वारे जागा भरण्याकरिता जाहिरात

महाजेनको ने सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या 590 पदाची रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशद्वारे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती 

आता यामध्ये नमूद पदांकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट बंधनकारक असणार आहे तशा प्रकारचे परिपत्रक विभागाकडून काढण्यात आला आहे 

महाराष्ट्रातील उमेदवारांना न्याय मिळावा व राज्यातील उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जावी यासाठी अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व इतर उमेदवारांनी केली होती

19:48 PM (IST)  •  21 Nov 2022

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ७ हजार २७४ पशुपालकांच्या खात्यांवर १८.४९ कोटी रुपये जमा

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात ७ हजार २७४ पशुपालकांच्या खात्यांवर १८.४९ कोटी रुपये जमा

सचिंद्र प्रताप सिंह

मुंबई, दि. २१ : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा ७ हजार २७४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. १८.४९ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.

श्री सिंह म्हणाले,महाराष्ट्रातील लंपी चर्मरोग प्रादुर्भाव परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक आज  रोजी 3 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहे. राज्यामध्ये दि. 21.11.२०२२ अखेर 34 जिल्ह्यांमधील एकूण 3666 संसर्गकेंद्रांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 282595 बाधित पशुधनापैकी एकूण 205110 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे.  उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. बाधित पशुधनापैकी 19077 पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर एकूण 144.12 लक्ष लस  उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून एकूण 137.97 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, वाशिम, जालना, हिंगोली, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांची आकडेवारी नुसार महाराष्ट्रात सुमारे 98.61 % गोवंशीय पशुधनाला लसीकरण झाले असल्याचे श्री सिंह यांनी सांगितले.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने दि. 7 ऑक्टोबर, 2022 रोजी कीटकांच्या नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवण्यात याव्यात. शासकीय आणि खाजगी पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी दिलेल्या सुधारीत उपचार विषयक सूचनांप्रमाणे उपचार करावेत. शासकीय अधिकाऱ्यांनी पशुपालकांकडे जाऊन औषधोपचार व लसीकरण करावे. शासनाकडून मोफत औषधोपचार व लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असल्यामुळे सर्व पशुपालकांना  आवाहन करण्यात आले की त्यांनी स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेण्यासाठी सहकार्य करावे.

नुकत्याच क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कृतीदलासमवेत  झालेल्या दृकश्राव्य माध्यमाद्वारे आढावा बैठकीमध्ये लसीकरण न केलेल्या आणि लम्पी चर्म रोगाने बाधीत नसलेल्या गायींच्या कुठल्याही वयाच्या वासरांना, तसेच अद्यापही लसीकरण  न झालेल्या गोवंशीय पशुधनास लसीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. यानुसार, गोपालकांनी त्यांच्या वासरे व गोवंशीय पशुधनास क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकक्षेतील गावांमध्ये अशा लसीकरणासाठी मोहीम स्वरूपात पूर्वनिर्धारीत केलेल्या दिवशी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही श्री.सिंह यांनी केले आहे.

17:50 PM (IST)  •  21 Nov 2022

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, गेल्या तासभरापासून सुरु आहे चर्चा

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. गेल्या तासभरापासून या दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. नेमक्या कोणत्या गोष्टीवर चर्चा सुरु आहे, इह अद्याप कळू शकलेलं नाही. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaZero Hour Ratan Tata:रतन टाटांच्या 'नॅनो' कारची गोष्ट... Dr Raghunath Mashelkarयांनी सांगितला किस्साMumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरीZero Hour Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राला विनंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
अंत्ययात्रा ते अखेरचा निरोप; रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला दिग्गज, स्मशानभूमीत कोण कोण पोहोचलं?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
राज्यात 6 दसरा मेळावे, मुंबईत ठाकरे-शिंदेंची तोफ, बीडमध्ये पाटील-मुंडेंचा जोश, कुणाचा दसरा कुठे अन् कधी?
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
पाटलांचा नाद खुळा... 900 एकरचं मैदान, 100 रुग्णवाहिका, दहा ICU कक्ष; जरांगेंच्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
मुंबईसह ठाण्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची तारांबळ, पुढील 2 तास सावधानतेचा इशारा
Ratan Tata: राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
राज ठाकरेंकडून रतन टाटांचे चरण स्पर्श; विमानतळावरील 'या' प्रेमळ फोटोमागची गोष्ट
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
एका रात्रीतच शुद्धीपत्रकात बदल करण्याची सरकारवर नामुष्की, दोषींवर कारवाई करण्याची पडळकरांची मागणी
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
पुण्यात स्वप्नातलं घरं, 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; कसा करायचा अर्ज, सोडत कधी; जाणून घ्या सर्वकाही
Ratan Tata : रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
रतन टाटांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी 'टाॅवर ऑफ सायलेन्स' सोडून विद्युत दाहिनीचाच पर्याय का निवडण्यात आला?
Embed widget