एक्स्प्लोर

Maharashtra News Updates : कात्रज बोगद्यापर्यंत ट्रॅफिक जाम, कात्रज बोगद्याजवळून पुण्याकडे जाणारी छोट्या गाड्यांची वाहतूक वळवली

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News Updates :  कात्रज बोगद्यापर्यंत ट्रॅफिक जाम, कात्रज बोगद्याजवळून पुण्याकडे जाणारी छोट्या गाड्यांची वाहतूक वळवली

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

27 तासांचा महाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मार्गावरील तब्बल 27 तासांच्या जम्बोब्लॉकला सुरुवात झाली आहे.  कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे लोकलसह एक्स्प्रेस ट्रेनवरही परिणाम होणार आहे. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक लोकल गाड्या, एक्स्प्रेस गा्डया रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सीएसएमटीकडे येणाऱ्या काही एक्स्प्रेस ट्रेन पुणे, पनवेल आणि नाशिकपर्यंतच धावणार आहेत. त्याशिवाय काही ट्रेन पुणे, पनवेल आणि नाशिकमधून मार्गस्थ होतील. मध्य रेल्वेच्या या 27 तासांच्या मेगाब्लॉकचा फटका जवळपास 27 लाख लोकांना बसणार आहे.

भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस

काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' आज नांदेड जिल्ह्यात प्रवेश करत 14 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात धडकली. आज 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशीही जळगाव जामोद या विधानसभा मतदारसंघातही यात्रा असणार आहे. त्यानंतर जळगाव जामोदमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करणार आहे. काल रात्रीचा मुक्काम या यात्रेनं भेंडवळ या गावी केला. त्याआधी राहुल गांधी यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली अर्पण केली.  

आजपासून गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात

53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा साजरा केला जाणार आहे.  देश विदेशातील कलाकार ,दिग्दर्शक, आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. गोव्यातील प्रमुख चौकात तसेच राजधानी पणजी येथे भव्य सजावट करण्यात आली आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी शाम मुखर्जी स्टेडियमवर अभिनेता अजय देवगण,अभिनेता सुनील शेट्टी,अभिनेता प्रभू देवा यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival) म्हणजेच 'इफ्फी'ची (IFFI) चर्चा आहे. आजपासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. 

फिफा विश्वचषक आजपासून

फिफा विश्वचषक आजपासून कतारच्या दोहा येथील अल बायत स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. फुटबॉल विश्वचषक प्रथमच मध्यपूर्वेच्या देशात आयोजित केला गेलाय. विश्वचषक स्पर्धेत एकूण 32 देशांचे संघ सहभागी होत आहेत. स्पर्धेतील पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजता सुरूवात होणार आहे. फिफाचा उद्घाटन सोहळा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अल बायत स्टेडियममध्ये होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या सोहळ्यात भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड सहभागी होणार आहेत.

23:03 PM (IST)  •  20 Nov 2022

Pune Mumbai Update: कात्रज बोगद्यापर्यंत ट्रॅफिक जाम, कात्रज बोगद्याजवळून पुण्याकडे जाणारी छोट्या गाड्यांची वाहतूक वळवली

Pune Mumbai Update: कात्रज बोगद्यापर्यंत ट्रॅफिक जाम, कात्रज बोगद्याजवळून पुण्याकडे जाणारी छोट्या गाड्यांची वाहतूक वळवली
#Pune
21:07 PM (IST)  •  20 Nov 2022

Pune News: पुण्यातील दरी पुलावर भीषण अपघात, 15 ते 16 गाड्या उडवल्याची माहिती

पुण्यातील दरी पुलावर भीषण अपघात, 15 ते 16 गाड्या उडवल्याची पोलिसांना खबर, घटनास्थळी सिंहगड पोलीस दाखल, कंटेनरने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर धडकले असे प्राथमिक अंदाज

17:55 PM (IST)  •  20 Nov 2022

हिंदुत्व विचारसरणी ही उद्धव ठाकरे यांच्या रक्तातच राहिले नाही :  चंद्रशेखर बावनकुळे

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने दोघांमध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे आता कोणासोबतही युती करू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जेवढे लिहून देतात तेवढेच उद्धव ठाकरे बोलतात, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांचे विचार आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मय झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे जेवढे स्क्रिप लिहून देतात तीच स्क्रिप्ट आता सामनामधून छापून येते. चाळीस आमदार सोडून गेल्यामुळे उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता कोणत्या विचारांसोबत आपण युती करतो आहे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांना कळत नाही, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.

16:28 PM (IST)  •  20 Nov 2022

बस पलटी झाल्याने प्रवासी जखमी , 7 प्रवासी किरकोळ जखमी

रायगड : जुना मुंबई - पुणे मार्गावरील खंडाळा घाटात अपघात ... 

ब्रेक फेल झाल्यामुळे खाजगी बसचा अपघात ...

बस पलटी झाल्याने प्रवासी जखमी , 7 प्रवासी किरकोळ जखमी ...

एकविरा येथून मुंबईच्या दिशेने  निघालेली बस पलटी... 

चेंबूर येथील शाळेतील कर्मचारी यांच्या बसला अपघात  ..

जखमी प्रवाशांना खोपोली येथील रुग्णालयात उपचार सुरू...

16:18 PM (IST)  •  20 Nov 2022

Mumbai Local Update: मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील सीएसएमटी आणि ठाणेच्या दरम्यान पहिली लोकल रवाना झाली 

Mumbai Local Update: मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील सीएसएमटी आणि ठाणेच्या दरम्यान पहिली लोकल रवाना झाली 
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget