Maharashtra News Live Updates : टिपरच्या धडकेत यवतमाळमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो.
आज महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. रिचर्ड्स अँड क्रूडास मिल पासून सकाळी 10.30 वाजता मोर्च्याला सुरूवात होईल. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल.
सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं माफी मांगो आंदोलन
सुषमा अंधारे, संजय राऊतांच्या विधानाविरोधात भाजपचं माफी मांगो आंदोलन करणार आहे. आज भाजप नेते अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाहेर आंदोलन करणार अहेत. तर अमित साटम, आगरकर चौक, अंधेरी पूर्व रेल्वे स्टेशनच्या बाजूला आंदोलन करणार. मनोज कोटक, राम कदम, निलयोग मॉल, जवाहर रोड, घाटकोपर पूर्व येथे आंदोलन करणार.
हिंदुत्ववादी संस्थांकडून आज ठाणे बंद
हिंदुत्ववादी संघटनांकडून आज ठाणे बंदची हाक देण्यात आलीय. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. या बंदला भाजप आणि शिंदे गटाने पाठिंबा दिलाय. ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतही आज बंदची हाक देण्यात आलीय.
18 तारखेच्या ग्रामपंचायत मतदानासाठी तयारी
धुळ्यात रविवारी होणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कर्मचाऱ्यांना मतदान साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. 119 ग्रामपंचायतसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अकोल्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केलीये. मतदान असलेल्या गावांमध्ये पोलिंग पार्टीज रवाना होतील. वाशिम जिल्ह्यात 18 डिसेंम्बर रोजी होऊ घातलेल्या 287 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केलीये. मतदान असलेल्या गावांमध्ये पोलिंग पार्टीज रवाना होतील.
नौदलात सामील होणार शक्तिशाली INS मुरमुगाव
INS Mormugao : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे अत्याधुनिक स्टेल्थ गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर मुरमुगाव (INS Mormugao) भारतीय नौदलात दाखल करतील. हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या (China) वाढत्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS मुरमुगाव रविवारी (18 डिसेंबर) भारतीय नौदलात सामील करण्यात येणार आहे. भारतीय नौदलाच्या म्हणण्यानुसार, ही युद्धनौका रिमोट सेन्सर मशीन, आधुनिक रडार, जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे यासारख्या शस्त्र प्रणालींनी सुसज्ज आहे.
भाजपा आमदार प्रवीण दरेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह एकूण 7 जणांची निर्दोष सुटका
भाजपा आमदार प्रवीण दरेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह एकूण 7 जणांची निर्दोष सुटका
त्रिपुरातील हिंसाचाराविरोधात मालेगावमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या निषेधाचं प्रकरण
गिरगांव महानगर दंडाधिकारी न्यायाधीश एन.ए. पटेल यांचा निर्णय
मात्र त्या हिंसाचाराविरोधात मुंबईत भारतीय जनता पार्टीच्यावतीनं एक आंदोलन करण्यात आलं होतं
या आंदोलन प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता गुन्हा
या गुन्ह्यातून शनिवारी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयानं पुराव्यांअभावी 7 आरोपींची केली निर्दोष सुटका
मालेगावमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान हिंदू लोकांवर करण्यात आली होती दगडफेक
त्या निषेधार्थ आझाद मैदानात झालेल्या आंदोलनादरम्यान बॅरिकेट हटवण्यात आल्याविरोधात दाखल केला गेला होता गुन्हा
यात प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, आकाश पुरोहित, अतुल शहा, राजेश शिरवळकर, शरद चेतनकर यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता
या सर्व आरोपींविरोधात आयपीसी कलम 269, 447, 37(1) (3), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम; उदय सामंतांची टीका
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. विक्रमी मोर्चा होईल असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. परंतु, महाविकास आघाडीच्या मोर्चात गर्दीच नव्हती.
टिपरच्या धडकेत यवतमाळमध्ये दुचाकीस्वार जागीच ठार
यवतमाळच्या पुसद तालुक्यातील गुंज येथे रेतीची वाहतूक करणाऱ्या टिपरने दुचाकीस्वारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. सुनील धानोरकर ( वय 42 रा. मधुकर नगर, पुसद ) असे टिप्परच्या धडके ठार झालेल्या मृतकाचे नाव आहे.
पायाखालची वाळू सरकल्यानेच लोकांना वेठीस धरून महामोर्चा: खासदार डॉ श्रीकांत शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील 5 महिन्यात विकासाचे अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. यामुळे विरोधकाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच लोकांना वेठीस धरून महामोर्चा काढले जात असल्याची टीका आजच्या महाविकास आघाडीच्या मोर्चावर खासदार डॉ. एकनाथ शिंदे यानी केली. कल्याणात महाराष्ट्र शासन आणि श्रीकांत शिंदे फाऊडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते.
माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक पदी नेमणूक
पुण्याचे माजी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना पुण्यात मोक्का किंग म्हणून ओळखलं जातं. त्यांनी आतापर्यंत शंभरहून अधिक मोक्का कारवाया केल्या आहेत. मात्र आता त्यांची राज्य कारागृह अपर पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.