Maharashtra News LIVE Updates 14 December 2022: सीमावादाच्या चर्चेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई संसदेत दाखल
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज दिल्लीमध्ये असणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ते आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई हे देखील आज दिल्लीत असणार आहेत. ते देखील अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेऊ,
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी (Maharashtra Karnataka Border Dispute) आज दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीत असतील. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील अमित शाह यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्थीनंतर कर्नाटकाच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.या बैठकीआधी बेळगाव जिल्हा कन्नड कृती समितीकडून बोम्मई यांना पत्र लिहण्यात आलं आहे. कोणत्याही परिस्थितीत बेळगाव आणि इतर परिसर महाराष्ट्राला देण्याबाबत तडजोड करु नये अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे.
महामोर्चासाठी महाविकास आघाडीची बैठक
17 डिसेंबरला होणाऱ्या मोर्चा संदर्भात आज अजित पवारांच्या दालनात मविआच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानपर्यंत असा हा मोर्चा निघणार आहे. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित रहाणार आहेत.
पुण्यात आजपासून सवाई गंधर्व महोत्सव सुरू
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 68वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharva Bhimsen Mahotsav) आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना संगीताची मेजवानी अनुभवायचा मिळणार आहे. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुलात हा महोत्सव पार पडणार आहे. दुपारी 4 वाजता सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर शाश्वती मंडल आणि रतनमोहन शर्मा यांचे गायन होईल. पहिल्या दिवशीची सांगता उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोद वादनाने मैफिल रंगणार आहे. 14 ते 18 डिसेंबर दरम्यान महोत्सव रंगणार असून कार्यक्रम स्थळी सुमारे 7 ते 8 हजार संगीत रसिकांना सामावून घेणाऱ्या भव्य दिव्य अशा मांडवाची उभारणी करण्यात आहे.
बैठक संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी
बैठक संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी गेले होते. तिथं पंधरा ते वीस मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राशी संबंधित विषयावर खलबतं झाल्याची शक्यता आहे.
नंदुरबार: जिल्ह्यात नवापूर आणि शहादा परिसरात जोरदार पावसाला सुरुवात
नंदुरबार:- जिल्ह्यात नवापूर आणि शहादा परिसरात जोरदार पावसाला सुरुवात... अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता....
कापूस ,केळी ,मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता.....
जिल्ह्यात दोन दिवसापासून होणाऱ्या अवकाळी पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभऱ्याच्या पिकांना आळीचा धोका
शरद पवार धमकी कॉल प्रकरण, आरोपी नारायण कुमार सोनीला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
शरद पवार धमकी कॉल प्रकरण,
आरोपी नारायण कुमार सोनीला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
गिरगाव कोर्टात आरोपीला करण्यात आलं होतं हजर
शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी गेल्या 4/5 महिन्यांपासून सतत धमकीचे फोन केल्याबद्दल अटक
मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे
मुंबई पोलिसांनी बिहारमधून आरोपी नारायण कुमार सोनीला ताब्यात घेतलं
तो मानसिकदृष्ट्या काहीसा विक्षिप्त असल्याची कोर्टात पोलिसांकडून माहिती
कर्नाटक महाराष्ट्र सीमवाद Update : जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत दोन्ही राज्ये यावर कोणताही वाद घालणार नाहीत : अमित शहा
कर्नाटक महाराष्ट्र सीमवाद Update : जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत दोन्ही राज्ये यावर कोणताही वाद घालणार नाहीत. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री एकत्रित बसतील आणि यावर चर्चा करतील. या दोन राज्यांतील लहानसहान मुद्द्यांवर चर्चा तीन मंत्री करतील. दोन्ही राज्यातील व्यापारी, प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नयेत यासाठी एका सिनियर आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करतील. अशी बैठकीत चर्चा झाली.
अरुण भेलकेला पुण्यातील विशेष सत्र न्यायालयाने UAPA कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा
माओईस्ट नेता अरुण भेलकेला पुण्यातील विशेष सत्र न्यायालयाने UAPA कायद्याअंतर्गत कठोर शिक्षा सुनावलीय. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल, देशाच्य अखंडतेला धोका निर्माण होईल असे साहित्याच्या प्रचार - प्रसार केल्याबद्दल भेलकेला विविध कलमांच्या अंतर्गत पाच वर्षांच्या चार, सात वर्षांची एक आणि दोन महिन्यांच्या दोन शिक्षा सुनावण्यात आल्यात. या सर्व शिक्षा अरुण भेलकेला एकत्रच भोगायच्या आहेत. अरुण भेलके हा 2014 मधे पुण्यातील कासेवाडी भागातून ए टी एस ने अटक केली होती. अरुण भेलके हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील असुन तो आणि त्याची पत्नी खोट्या नावाने पुण्यात राहात होते. संजय कांबळे हे खोटं नाव त्याने त्यासाठी धारण केलं होतं. पुण्यातील कासेवाडीत त्याने देशभक्ती युवा मंच हे संघटन स्थापन केलं होतं आणि शहरातील तरुणांन नक्षलवादी चळवळीकडे वळवण्याचा, त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्याचा त्याचा प्रयत्न होता.